पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २०५. उत्तेजित होणें, आचके, चलन - -हास, अंगावरून वारें जाणें व एकदम शक्तिपात ह्या भावना पुढील अवस्थेत बहुधा होतात. स्तनावरील ट्युबर्कल ग्रंथी विस्तृत, वेदनारहित, साधारण कठीण व स्तनाच्या पावपट घेराचा असतो. तो बहुधा मागल्या एकाद्या स्तनावर असतो. दूध प्रथम नित्यवत् असतें; नंतर तें पातळ पाण्यासारखें होतें. त्यांत घन कण तरंगतात आणि नेहमीं नाहीं तरी कधीं कधीं विशिष्ट जातीचे जंतू आढळतात. प्यूडिक पिंडवृद्धि पावतात. स्तनाच्या एरवींच्या सुजे- प्रमाणें ही सूज जलदी येत नाहीं व ह्यांत वेदना फार कमी असतात. मरणोत्तर परीक्षा मुख्यतः फुप्फुसें व सिरस त्वचा ह्यांवरून करतात. कारण त्यावर ट्युबर्कल पुष्कळ उठतात. फुप्फुसांत द्राक्षाच्या घोसाच्या आकराचे टयुवर्कल प्ल्यूराचे पृष्ठभागावर दिसतात. शरिरांतील निर- निराळ्या भागांतील लिंफाचे पिंडांत सूज व ट्युबर्कल असतात. डुकरांत रोगोत्पत्ती प्रथमतः आंतड्यांत, व मांजरांत फुप्फुसामध्ये होते. हा आजार कधीं कधीं शेळ्यांना होतो. म्हणून शेळ्यांचें दूध नेहमीं निर्दोष असतें हा समज चुकीचा आहे. पक्ष्यांत मुख्य चिन्हें खालीं वर्णिल्याप्रमाणे होतातः - कृशता, स्लेष्मल त्वचा फिकट होणे, क्षुधानाश, वांती, अतिसार, सांध्यांची सूज, ग्रंथी व कधीं कधीं व्रण. एक्टिनो-मायकोसिस हा आजार गायी व म्हशी, विशेषतः वासरें आणि डुक्कर, घोडा, मेंढी व मनुष्य ह्यांना होतो. हा विलंबी आजार आहे. ह्यांतील भावनाः- चर्वणामुळे वेदना झाल्यानें अन्नाचा कंटाळा, जीभ व जबड्याची सूज, विपुल लालोत्पत्ती, कष्टमय गिलन, कष्टश्वास हीं चिन्हें होतात. कारण घसा व कृक ह्यांमध्यें ग्रंथी उत्पन्न होतात. परॉटिड भागांत सूज व ग्रंथी