पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ आरोग्यशास्त्र - उत्पन्न होतात. मानेच्या मणक्यांत आजार झाल्यानें अंगावरून वारें जातें “व फुष्फुसांत आजार झाल्यामुळे क्षयासारख्या भावना होतात. ह्या आजारांतील ग्रंथींमध्ये रे- फंगस सांपडतें. यावरून निश्चित परीक्षा होते. ● मनुष्य प्राण्यांत खालील भावना होतात. मुखांतील अस्थींमध्यें व जिन्हेंत विद्रधि होतात. कधीं कधीं आजाराचा आरंभ यकृत, फुप्फुस, आंतडीं व चर्म ह्यांमध्ये होतो. बाह्य भागांतील रोग नाहींसा होऊन तो उलटून फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, पेरिटोनियम, आंतड ह्यांत उमटतो. फंगींनी भरलेल्या वनस्पतींपासून ह्या रोगाची उत्पती होते. श्वानदंश ह्या आजारांत कुत्रीं, लांडगे, घोडे, गायी, बैल, मांजरें, डुकरें, मेंढ्या, शेळ्या इत्यादि जनावरांच्या लाळेंत विष असतें. पक्ष्यांना देखील हा आजार होतो. पिसाळलेल्या जनावरानें केलेल्या दंशाचे द्वारां शरिरांत विषाचा प्रवेश होतो. कुत्र्यामध्ये तीन ते सहा आठवडेपर्यंत मुग्धावस्था राहाते. कधीं कधीं ती फार थोडे दिवस राहाते. कधीं कित्येक महिनेपर्यंत लांबते. कुत्र्या- मध्ये क्रोधयुक्त व मौन जातीचें असें दोन प्रकारचें वेड असतें. क्रोधयुक्त वेडाच्या तीन अवस्था असतात. ( १ ) खिन्नता. ( २ ) क्षुब्धावस्था, ( ३ ) व वारें जाणें ( पॉरॅलिसिस ). प्रथमावस्था बारा ते अठ्ठावीस तास टिकते. ह्यांत क्षुधा अनियमित असतं. खिन्नता, मनक्षोभ, त्वेष, व संशयी वृति ह्या भावना होतात. तें कोणत्याहि जिनसाला चावतें आणि लांकूड, दगड वगैरे परके पदार्थ गिळतें. दंशस्थानीं कधीं कधीं अति कंडू असते. द्वितीय अवस्था तीन ते चार दिवस असते. ह्यांत त्वेष व क्रोधाचे कित्येक तास राहणारे झटके येतात व आचके येतात व पुन्हा ते थांबतात.