पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २०७ तो प्राणी फार चिडखोर होतो व पळून जाण्याचा प्रयत्न करतो. थोपट - ण्याची तीव्र इच्छा प्रदर्शित करतो. नंतर दाताचे तुकडे पडतील इतक्या जोरानें चाऊं लागतो. त्याच्या जवळ जाईपर्यंत तो माणसाला चावायाला जात नाहीं. ध्वनिरज्जूंचा चलननाश झाल्यामुळे आवाज घोगरा होतो. वेडापेक्षां मिथ्याभास अधिक असतात. तृतीय अवस्थेंत जनावर कृश होतें. त्याचे केस ताठ उभे राहतात व खरखरीत होतात. डोळे खोल जातात व कांचेसारखे दिसतात. गिलनक्रियेच्या स्नायूंचा गतिहास झाल्या- मुळे गिळण्याचे कियेचा लोप होतो. खालचे दाभाडाचें चलन बंद पडतें. जीभ बाहेर लोंबत राहते. नंतर मागील पायांची गति बंद पडते. ह्या अवस्थेत संतापाचे वेग येतात. पुढे ते कमी जोराचे व कमी होत जातात. शेवटीं ५ ते १० दिवसांचे आंत जनावर मरतें. मुक्या वेडांत द्वितीय अवस्था लुप्त किंवा अल्पकालिक असते. मनुष्यांमध्ये ह्या आजाराच्या होणाऱ्या भावनांचें वर्णन थोडक्यांत खाली दिलें आहे. दंशस्थानीं वेदना होऊं लागतात. वाधाण्याच्या गांठी येतात. द्रव पदार्थांचा तिटकारा येतो. द्वितीय अवस्थेत परावर्तित क्रिये- मुळे विशेषतः घशांत आचके येतात. म्हणून गिळण्याचे प्रयत्न किंवा पाण्याचे दर्शक अथवा जलाचे कल्पनेनें देखील तेथें आचके येतात. बडबड असते, वेड उत्पन्न होतें. काळजी, अस्वस्थता व तहान हीं फार असतात. मुखावाटें लाळ गळत असते. तृतीय अवस्थेत संन्यास (स्थानिक घात ) व आचके ह्या प्रमुख भावना असतात. दोन ते चार दिवसांत मृत्यु येतो. मनुष्यामध्ये दंशानंतर मुग्धावस्था बहुधा सहा आठवडे असते. परंतु ती सहा दिवसांपासून दोन वर्षांपर्यंत असते. निःसंशय पिसाळलेल्या कुत्र्यानें चावलेल्या लोकांपैकी शेकडा १५ लोकांना हा आजार होतो, पण ज्यांना होतो त्यांपैकी एकही जगत नाहीं.