पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ आरोग्यशास्त्र पॅस्टॉर नामक फ्रेंच शोधकानें संरक्षक अंत:क्षेप ( पिचकारी ) चिकित्सेचा नामी शोध लावला आहे. तिचें संक्षिप्त वर्णन खाली दिलें आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या किंवा लांडग्याच्या मेंदूंतील विष सशाचे चर्मांत पिचकारीनें सोडतात. एका सशाचें विष दुसऱ्यांत आणि दुस- यचे मेंदूतील तिसऱ्यांत व तसेंच पुढे करीत जातात. व तें अत्यंत तीव्र होऊन सात दिवसांत ससा मेला म्हणजे हें बंद ठेवतात. सातवे दिवशीं मेलेल्या सशाचे रीढक (स्पैनल कॉर्ड ) २५०° सेंटिग्रेडचे ऊष्णतामाना- वर १ ते १४ दिवसपर्यंत वाळवतात. ह्या क्रियेनें विष कमी होत जात जात चवदाव्या दिवशीं नाहींसें होतें. श्वानदंश झालेल्या इसमास प्रथम १४ दिवस वाळलेल्या रीढकाच्या द्रावणाची पिचकारी देतात, पुढे १३ दिवस वाळलेल्याची; पुढें १२, ११, १०, ९ इत्यादि दिवस वाळ- लेल्याची पिचकारी मारतात व असें करीत करीत शेवटीं अत्यंत विषारी अशा पहिल्या दिवसाच्या वाळवणाच्या रीढकाची पिचकारी मारतात. दंश झाल्याबरोबर ज्यांना ही चिकित्सा मिळते ते सर्व वांचतात. त्या- मध्ये मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असतें. दंश झालेल्यांत मृत्यूचें शेकडा प्रमाण १५ असतें व प्रतिबंधक चिकित्सा केलेल्या लोकांत १.३६ असें हें प्रमाण कमी कमी होत होत ०.४८ पेक्षांहि कमी झालें आहे. दंश मोठा असल्यास अंतःक्षेप अधिक वेळा करावा लागतो व तीव्र रीढका - पर्यंत पाळी लवकर आणावी लागते. ह्याला इंटेंसिव्ह ट्रीटमेंट म्हणतात. 1 ह्या देशांत पिसाळलेल्या कुत्र्यापासून हा रोग मुख्यतः पसरतो. जेथें मुस्कटदाबी व उनाड कुत्र्यांचे वधाचे नियम असतात, तेथें या रोगाचें बहुतेक निर्मूलन झाले आहे. मनुष्याला अथवा कुत्र्याला पिसाळलेले जनावर चावल्याचा पुरावा असल्यास पूर्वरूपाच्या भावनांची परीक्षा होते. पिसाळलेल्या कुत्र्याचे मरणोत्तर परीक्षेत शरिराच्या रचनेत विशेष प्रकारचे नित्याचे फेरफार