पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २०९ दिसत नाहीत. परंतु खालील निर्णयात्मक फेरफार समजावेत. कृशता, कृष्णरक्त, श्लेष्मल त्वचेंत व बहुतेक अंतरिंद्रियांत रक्ताधिक्य, इसाफेगस व जठर ह्यांमध्यें, गवत, केंस, पिसें, दोऱ्या, ढलप्या, वाळू इत्यादि परकी पदार्थ आढळतात, पण अन्न नसतें. गालाचे व जठराचें श्लेष्मल त्वचेंत थोडा रक्तसाव पुष्कळ वेळां आढळतो व आंतडीं बहुधा मोकळी असतात. फूट अँड माउथ डिसीज हा रोग सर्वस्वी अॅग्युलेट जातीमध्ये होतो. म्हणून मुख्यत: गाय, म्हैस, मेंढ्या, डुकरें व शेळ्या ह्यांमध्ये होतो. परंतु रवंथ करणारे सर्व रानटी पशू ह्या आजारास पात्र आहेत. गुराढोरांत खाली लिहिल्याप्रमाणें भावना होतात. मुखाची श्लेष्मलत्वचा कार्नेटवरील व बोटांच्या बेचक्यांतील चर्मावर जलस्फोट व व्रण होतात. हिरडया, जीभ, गाल व ओठ ह्यांवरील पिवळे लहान जलस्फोट वाढतां वाढतां पांच शिलिंग नाण्याचे आकाराचे होतात. नंतर ते फुटून त्यांचे जागीं व्रण पडतात. लाळ पुष्कळ वाहात राहते. आणि वेगाने पुष्कळ त्याची कृशता येते. दुधाचा वर्ण व रुचि कोलोस्ट्रम (Colostrum ). सारखी असते. दूध काढल्यामुळे दुभत्या जनावरांत स्फोटांचा प्रसार कासेवर व स्तनावर होतो. कासेमध्यें तो प्रवाह कित्येक वेळां दृष्टीस पडतो. कधीं कधीं घशांत व्रण पडतात. कष्टश्वास व नासिका आणि श्वास नलिकांचा सखाव दाह होतो. शिंगाच्या मुळ जवळील त्वचा व हवा योनी आणि एकंदर चर्म ह्यांवर कधीं कधीं जलस्फोट उद्भवतात. पावलाच्या भावना खालीं लिहिल्याप्रमाणे असतात. प्रथम कॉरोनेट ( Coronet) मध्यें व विशेषतः बोटांचे (Toyes) मधील स्थानों व तळव्याचे ૧૪