पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० आरोग्यशास्त्र बाजूकडे वेदनायुक्त सूज उत्पन्न होते. नंतर जनावर लंगडूं लागतें. कधीं कधीं श्वास व त्यासंबंधीं सूज येते. नंतर व्रणविद्रधी होतात. ह्यामुळे स्वर गळून पडतात. सार्वदेहिक भावना पायेमिया (Pyemia) विकाराच्या असतात. जहरी स्वरूपाचे रोगास मेंदुगत रक्तसावाप्रमाणें भावना होतात व कृतिजन्य विषाराची (टॉक्सिनची) वाढ रक्तास झाल्याने हृदयाची क्रिया बंद पडून मृत्यु येतो. दूध, लोणी व चक्का दही ह्यांचें द्वारां अथवा हातावरील क्षतांचे मार्गाने ह्या विकाराचा पसार मनुष्यांत होतो. भावना :- ज्वर, पचनाचा बिघाड, मुख, अंगुळी, बाहू, स्त्रियांचे स्तन, घसा, नेत्रांतील कंजंक्टायवा ह्यांवर जलस्फोट उत्पन्न होणें; उदरांत वेदना व वांत्या ह्या भावना होतात. अल्पवय रोग्यास कधीं कधीं मृत्यु येतो. मांसाचे सेवनाने ह्या विकारांचा प्रसार होत नाहीं. दूषित गोदुग्धानें तान्ह्या मुलांमध्ये ह्याच्या थोड्या सांथी झाल्याचें वर्तमान आहे. ग्लॅडर्स ग्लॅडर्स व फर्शी ही एका आजाराचीं भिन्न रूपे आहेत, असें हल्लीं सिद्ध झाले आहे. घोडा, गाढव व खेंचर ह्या जनावरांत हा आजार प्रथमतः होतो. परंतु प्रत्यक्ष स्पर्शाने हा आजार मनुष्यांत व इतर प्राण्यांत पसरतो. कांहीं सालांत त्यानें पुष्कळ घोडी मृत्यु पावतात. ( Injestion) श्वासोच्छ्रसन व जखमांतून विषार शिरणें ह्या कारणांनी हा रोग अन्य प्राण्यांना होतो. ह्या आजाराचे शीघ्र व विलंबी असे दोन प्रकार असतात. शीघ्र प्रकारांत भावनांची वाढ फार वेगाने होते. प्रमुख भावना खाली दिल्या आहेत. तीव्र ज्वर, पेटके, नाकावाटें प्रत्यक्ष श्लेष्मायुक्त पुषाचा साव