पान:आरोग्यशास्त्र.pdf/२१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २११ च नंतर रक्तमिश्रित साव, नासिकेतील त्वचेवर गांठी, प्रथम विभक्त च नंतर अनेकदा एकत्र पसरलेली व डिप्थेरिया आजाराप्रमाणें कुचकट पदार्थांनी आच्छादलेलों क्षतें, कष्टश्वास व गर्जना केल्याप्रमाणें अंतश्वास ह्रीं चिन्हें असतात. चर्मावर कठीण गांठी व क्षतें हीं पडतात. उदक- वाहिन्यांचा दाह, विशेषतः मस्तकाचे आरंभस्थानांत असतो. लिंफॅटिक पिंडांचा दाह व पूयाभवन, कष्टप्रदगिलन, अतिसार व शीघ्रगामी कृशता ह्या भावना असतात. ह्या प्रकाराने ३ ते १४ दिवसांत हटकून मृत्यु येतो. विलंबी प्रकाराचा आरंभ अस्पष्ट असतो. ह्याची चिन्हें खाली दिलीं आहेत. विलंबी प्रतिशाय असतो ह्यांतील साव पुढे कमी चिकट होतो. पिवळा व कधीं रक्तमिश्रित असते. व्रणांमधून होणारा रक्तसाव ही अनेक वेळा पहिली दृश्य भावना असते. पुढे नासिकेतील श्लेष्मल त्वचेवर गांठी व क्षतें पडतात. आणि दाभाडाच्या खालचे लाल पिंडांमध्यें सूज उत्पन्न होते. कधी कधीं खोकला व कष्टश्वास असतो व सामा- न्यतः अनियमित जातीचा ज्वर असतो. कृशता पुष्कळ असते व उत्तर अवस्थेत हात, पाय, उदर व छाती ह्यावर दडस प्रकारची सूज येते. विलंबी त्वचेवर गांठी कमी वेळां येतात. ग्रंथीचा अथवा (Faray bads ) आकार वाटाण्यापासून Walmil येवढा असतो. त्यापुढे कमी होतात. परंतु सामान्यतः त्याच्या जागी क्षतें पडतात. ह्यांतून बाहेर जाणाऱ्या उदकवाहिन्या सुजून गांठी मारलेल्या दोरीप्रमाणें व त्याच्या माथ्यावर कधी कधीं व्रण पडतात. दूषित झालेल्या लिंफांचे पिंड पुष्कळ वेळां सुजतात व पुढे कठीण होतात किंवा पुवाळतात. त्वचेवरील ओरखडा इ. मधून दूषित सावाचा प्रवेश झाल्याने ह्या रोगाचा प्रसार मनुष्यांमध्ये होतो. पंजे, नाकाची श्लेष्मल त्वचा, ओठ व डोळ्यांवरील व पापण्यांवरील कंजंक्टायवा नामक त्वचा या मधून