पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ आरोग्यशास्त्र परंतु जर विहीरी गावांपासून दूर व उच्च भाग खोदल्या तर, त्यांच्या दूरत्वामुळें गांवांतील घाण त्यांत शिरणार नाहीं व त्यांचे उच्च्य स्थानामुळें गांवांतील शौचकुपांतील झिरपा उलटा वर चढून त्यांत जाऊं शकणार नाहीं. म्हणून ह्या कारणापासून त्यांतील जल दूषित होणार नाहीं. गांवांपासून ह्या विहीरीचें अंतर तिच्या खोलीच्या १०० ते १६० फूट असावें. विहीरीवर झांकण करावें व तिचें पाणी पंपाने ओढावें. विहीर आंतून अभेद्य पदार्थांनी बांधून काढावी म्हणजे, भूपृष्ठावरील द्रव स्थिति प्राप्त झालेल्या द्रव्यांचा व खनिज पदार्थांचा प्रवेश त्यांत होणार नाहीं. आंतभौम जलाच्या सपाटींत किंवा पृष्ठभागाच्या उंचींत अंतर पडत नसेल तर, पाण्याचा पुरवठा भरपूर राहील व तें दूषित होण्याचा संभव कमी राहील. उथळ विहीरींच्या अत्यंत दूषित पाण्यांत हें विशेष आहे कीं, तें बहुधा काळेभोर, चमकदार व रुचकर असतें. झिरपून खालीं जाणाऱ्या पाण्यांतील घन भाग विहीरीच्या पाण्यापर्यंत पोहोचत नाहीं; तरी पण त्या पाण्यांतील घातुक धर्म कमी होत नाहीं. फार उथळ विहीरींत घन भाग उतरले तर, त्यांत क्लोरैड्स सांपडतात व त्याला अमोनियाची घाण येते. प्राणिज पदार्थ द्रव स्थितींत असतात व नैट्रेट्स आणि नैट्रैट्स हे देखील असतात. तथापि पाण्यांत कॅर्बानिक अॅसिड वायु पुष्कळ असल्यानें तें चमकदार दिसतें. जोराची वृष्टि झाल्यावर पाणी गढूळ होतें. वरून जोराचा पाऊस झाल्यास पाण्यांतील गढूळ भागहि कूपजलांत जातात. कारण वरून पाण्याच्या धारा वेगानें पडल्याने जमिनींत एकदम पुष्कळ जल मुरतें. तें हळुहळू उतरत नाहीं. त्यामुळे त्याची गाळणी नीट होत नाहीं. कूपजल बिघडलें अशी शंका आल्यास नासकें द्रव्य कोणत्या मार्गानें विहीरीत उतरतें याचा छडा लावण्यासाठीं कित्येक तऱ्हेचीं रासायनिक द्रव्ये वापरतात. त्यांचा रंग, चव व रासायनिक धर्मांवरून