पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ आरोग्यशास्त्र बहुधा स्पर्शसंचार होतो. दूषित भागांमध्यें दाह व वेदना होतात. आसपास वाधण्याच्या गांठी येतात. ज्वर, नासिकेतील स्राव, नासि क्षतें, चर्मांत पूयस्फोट व क्षतें, मुख, घसा, कृक व कंजंक्टायवा क्षतें; कधीं कधीं सांध्यांमध्यें दाह व कधीं कधीं तीव्र व जोराचा जठराचा व आंतड्याचा दाह ह्या भावना होतात. पंधरा दिवसांपासून एक महि- न्यांत मृत्यु येतो. अथवा रोगाचें स्वरूप विलंबीं जातीचें होतें. आजार निव्वळ स्थानिक असून अग्निप्रयोग आरंभी झाला असेल तर मृत्यूचें प्रमाण बेताचें असतें. नाहीतर फार अधिक असतें. . एकंदर घोड्यांत दृश्य भावना नसून त्याला हा रोग असूं शकेल. जंतूंपासून केलेल्या मॅलेइनचा प्रवेश करून त्याची परीक्षा करण्यांत येते. जनावरांत २० सें. उष्णतामान वाढल्यास हा रोग खास आहे असें समजावें. १.२० ' वाढल्यास संशय राहतो. ह्या आजाराचा फैलाव न व्हावा म्हणून दूषित जागेंतील घोड्यांची तपासणी करावी. पाणी निरनिराळ्या भांड्यांनीं पाजावें. दूषित जनावरांचा वध करावा व संशयित जनावरें पृथक जागी ठेवावीं. दूषित जागेचे निर्जंतुकरण करावें. नवीन खरेदी केलेले घोडे कांहीं दिवस दूर ठेऊन तपासून नंतर तबेल्यांत ठेवावे. ह्या रोगाने मेलेली जनावरे सहा फूट खोल पुरावी व त्यावर पुरेसा भाजलेला चुना घालावा. ओला - जनावरांवरील मसूरिका बहुतेक सर्व पाळीव जनावरांना मसूरिका होतो. जेनरनें १७९६ मध्ये ह्याची उस मनुष्यांत घातली व त्यानें मनुष्यांना देवी येत नाहींत असें १७९८मध्यें सिद्ध केलें. एकाच लसीनें दुसऱ्याला ह्या रोगा- - पासून निर्भयता प्राप्त होते. ह्यावरून मनुष्यांतील व जनावरांतील मसू- कांमध्ये फार साम्य आहे हें सिद्ध होतें.