पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २१३ ह्या आजाराची मुग्धावस्था सुमारें एक आठवडा असते. ह्या विकाराच्या चार अवस्था मानल्या आहेत. ( १ ) प्रथमावस्था एक दोन दिवस राहते. ह्यांत ज्वर, श्लेष्मल त्वचांचा खाव व पुरळ हीं असतात, (२) स्फोटकारी अवस्था सहा ते आठ दिवस राहते. एकाएकी तांबडे टिपके उठतात. त्यांना टांचणीच्या बुंध्याच्या आका - राच्या गांठींचें रूप येतें. तिच्या भोंवतीं लाल कड्याळ होतें; त्यांना थोडे दिवसांनी निळसर पांढऱ्या रंगाच्या जलस्फोटाचें रूप येते. त्यांचे माथ्यावर खळी असते, ( ३ ) पूयावस्था दोन किंवा तीन दिवस टिकते. जलस्फोटाचे पूय स्फोट होतात. स्फोटकारी अवस्थेपासून उत- रलेला ज्वर पुन्हां वाढतो, ( ४ ) खपल्याची अवस्था ३ ते ५ दिवस राहते. पूयस्फोट वाळून त्याच्या प्रथम पिवळ्या व नंतर काळसर उदी रंगाच्या खपल्या होतात, पुढे त्या गळून पडतात; व त्यांच्या जागीं तांबडा चकचकीत व्रण पडतो. कधीं कधीं स्फोट एकांत एक पसरतात किंवा त्यांत रक्तसाव होतो. गोमसूरिका मुख्यतः वासरांना होतात. स्फोट बहुधा कांसेवर व स्तनांवर होतात, ज्वर नसतो किंवा थोडा असतो. हा रोग सुसाध्य असतो. गोठ्यांमध्ये हा आजार एका जनावरापासून दुसऱ्याला हळु- हळू होतो व स्फोट एकंदरीत एकवीस राहतात. जनरने १७९८ मध्ये गोमसूरिकेतील उदकाचा म्हणजे व्हॅक्सि- नचा देवी काढण्याकडे उपयोग केला. गोमसूरिका क्वचित होतात म्हणून एका माणसापासून दुसऱ्याला देवी टोंचण्याची पद्धत मागाहून सुरूं झाली. परंतु ह्या व्यवस्थेत उणीव असल्यामुळे गोमसूरिकेचा उपयोग देवी टर्टोचण्याकडे पुन्हां सुरू झाला. लसीसाठी तीन ते सहा महिन्यांच्या वासरांना गोमसूरिकेची लस पोटाच्या त्वचेवरील केस काढून व निर्जतु- करण करून तेथें टोचतात. चार पांच दिवसांत उठून त्या पूर्णावस्था पाव-