पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ आरोग्यशास्त्र तात. ह्यांतील लस मनुष्यांना देवी काढण्यास व नव्या वांसरांपासून लस उत्पन्न करण्यास योजतात. एका वांसरापासून एक ते तीन हजार डोज म्हणजे मात्रा प्राप्त होतात. ओली किंवा सुकी लस राखून ठेवण्याचे तीन प्रकार आहेत. (१) ही लस बारीक कांचनलिकेत राखून ठेवतात. परंतु ह्यांत तिचे गुण कमी होऊन नष्ट होतात, ( २ ) किंवा वांसरांच्या खपच्या वाळवून कांचेच्या तबकड्यांत घालून पॅरॉफननें बंद करून ठेवतात. अशा व्यवस्थेनें त्याचें वीर्य कित्येक महिने टिकतें, ( ३ ) अथवा लस ग्लिसेरिनमध्ये खलून सूक्ष्म कांच- नलिकेत ठेवतात. स्कार्लेट फीवर - लोहितांग ज्वर नीच प्राण्यांत लोहितांग ज्वर होतो असें म्हणतात. परंतु पेटो कियल ज्वराला चुकून हें नांत्र दिलें असावें. कारण त्यांत त्वचेंत व अंतरिंद्रियांत वांटाण्यापासून पैशाच्या आकाराएवढे रक्तस्रावाचे टिपके पडतात. मनुष्याचे लोहितांग ज्वराचा व गाईच्या कोणत्याहि स्फोटकारी विकाराचा संबंध नसतो; व मनुष्याच्या संसर्गानें गाईंना हा आजार जडत नाहीं. ग्रंथिक सन्निपात ( प्लेग ) घुशी, उंदीर, कबुतरें, मांजरें, माकडें व डुकरें ह्यांना प्लेग होतो. माशा, पिसवा, व डांस ह्यांच्या द्वारा या रोगांचा फैलाव होतो. पक्ष्यांतील कातरा, डुकरांतील धावरे, हॉग फीवर, डुकराचा कॉलरा, घोडे, गाई, म्हशी व शेळ्यांस ह्यांच्या सांथीचा पन्यूरो- न्यूमो• निया, कॅटल प्लेग, स्लीनिक, अॅपॉप्लेक्सी व कारटर हल ह्या आजारांचा प्रसार मनुष्यांमध्ये होतो असे दाखविण्यांत आलें नाहीं. •