पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २१५ गुरांची संग्रहणी, अश्वादिकांतील इन्फ्ल्यूएंझा, पक्षी, जनावरें, वांस, डुकरांचा डिप्थेरिया, ह्यांचीं व मानवांतील त्या त्या आजारांचीं कारणें एकच आहेत असें सिद्ध झाले आहे. वांसरें व पक्षी ह्यांमध्ये व मनुष्यांत होणारा श्रश ह्या आजाराची उत्पत्ति एकाच फंगसपासून होते. दि पायरो-प्लास्मोसिस ह्या नांवाखालीं पॅरोप्लाज्मा पासून होणारे कित्येक स्पर्शसंचारी आजार मोडतात. टिक्सच्या द्वारां एकापासून दुसऱ्या प्राण्यास स्पर्श संचार पोहोचतो. पॅरोप्लाज्मोटा हे प्रोटोजोआ जातीचे आहेत, त्या माफटे ऑर्गेनिजमचा आकार वाटाण्यासारखा असतो. दूषित प्राण्याचें लाल रक्तकणांमध्ये एकटे किंवा एक अथवा अनेक जोड्यांनीं ते सांपडतात. रक्तकणांच्या बाहेर देखील मोठे जंतू सांपडतात. टेक्सस् फीवर (गुराढोरांचा रेड वॉटर आजार), व्होडेशियन फीवर ( गुरेढोरें ह्यांमधील ), कासिँएँगा ( युरोपांतील मेंढ्यांतील ) हे आजार प्लोटो- प्लज्मेपासून होतात. कुत्रा ( दक्षिण आफ्रिकेतील ), घोडा, गाढव, खेचर ( दक्षिण आफ्रिका) माकड ( युगांडा ) व मनुष्यांचा रॉकी माउं- टन फीवर, हे आजार पायरो प्लास्मोसिसपासून होतात. ब्राझीलमध्ये कोंबड्या, बदकांना स्पायरो केटी आजार होतो. ह्या सर्व आजारांच्या आरंभीं ज्वर येतो. रक्तकणांचा नाश होतो. सौरममध्यें हिमोग्लोबिनूचा रंग उतरतो व तें मूत्रांत येतें; बहुधा कावीळ होते. मनुष्याच्या ब्लॅक वॉटर आजाराच्या भावना अशाच असतात. हे रोग कोळ्याच्या जातीच्या टिकनामक किड्यांमुळे पसरतात. दूषित प्राण्याचें रक्त प्यालेल्या रक्तापासून टिकमध्ये कृमींचा प्रवेश होतो व अशा टिकमुळे वरील रोगांचा प्रसार होतो.