पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ आरोग्यशास्त्र रोगाच्या सांथीची चौकशी वस्तीमध्ये रोगाच्या सांथीचें कारण शोधतांना अमक्या कारणा- पासून अमुक परिणाम झाला ह्याबद्दल पूर्ण व खात्रीचा पुरावा कचित सांपडतो. एका प्रकारच्या स्थितिमानाचा रोगाचे सांथीशीं निकट संबंध होत असल्यामुळे ती होण्याचा संभव दुसऱ्या प्रकारच्या स्थितिमाना- पेक्षां अधिक संभवनीय आहे एवढे दाखवितां येतें. एखाद्या सांथीच्या कारणाचा थांग लावतांना तिच्या पूर्वीच्या स्थिति- मानाची माहिती करून घेतली पाहिजे. असें केल्याने रोगाचा संबंध कोणत्या गोष्टीशी येतो व कोणत्याशीं येत नाहीं, ह्याची तुलना करावयास सांपडते. शिवाय बाह्यतः एकाच स्थितीत दिसणाऱ्या व दूषित लोकांविषयीं वरीलप्रमाणें चौकशी करावी म्हणजे दोघांच्या . पूर्ण स्थितिमानामध्यें ठळक प्रकारची भिन्नता आहे कीं काय ह्या- विषयीं निश्चय करतां येतो. उदाहरणार्थ, एकाच ताटांतलें अन्न खाल्लयानें अनेकांना अमुक एक आजार झाला. एवढ्यावरून त्यापासून रोग झाला असें म्हणतां येणार नाहीं. तर समान स्थितींत असलेल्या अन्य लोकांमध्यें अन्न न खाल्लयामुळे तो रोग झाला नाहीं हें दाखवितां आलें पाहिजे. स्पर्शसंचारी रोगाच्या साथींमध्ये आवश्यक गोष्टींचा शोध लावणें अधिक अवघड असतें. कारण त्यांमध्ये मुग्धावस्था ( इन्क्युबेशन पीरियड) असते. ह्या अवस्थेचा काल मित्र असतो व जंतूंचा प्रवेश अनेक मार्गांनी होतो. टॉयफाइड फीवरच्या सांथीं- मध्ये हें विशेष लागू पडते. कधीं कधीं रोग होणाऱ्या लोकांमध्ये पूर्वी घडलेलीं कारणें आढळत नाहींत व रोग न होणाऱ्यांपैकीं कांहीं लोकांत तीं असली तरी तेवढयावरून कार्यकारणमीमांसा नेहमीं खोटी ठरत नाही.