पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार २१७ एखाद्या सांथीविषयीं कारणें शोधतांना प्रचलित किंवा प्रसिद्ध असलेली कारणें अस्तित्वांत नाहीत अशा विषयीं खात्री करून घेतल्याशिवाय एकाद्या नव्या व संशय उत्पन्न करणाऱ्या कारणानें रोगोत्पत्ती झाली असें ठरविण्याचे धाडस करूं नये. कधीं कधी सांथीच्या उत्पत्तीचें कारण आपोआप अनुभवानें समजते. उदाहरणार्थ:- एखाद्या शाळेत डिप्थेरियाची साथ सुरू झाल्यावर त्यांतील ज्या मुलाला नाकांत विलंबी वृण व स्राव असेल त्यांच्या कांहीं काल घरी बसण्याने शाळेतील सांथ थांबते व पुन्हां तो येऊं लागल्यावर जर ती पुन्हा सुरू झाली व त्याचे नासि- खावांत सूक्ष्म दर्शकाने " क्लेव्सलॉप्लर " बॅसिली सांपडेल तर तो मुलगा डिप्थेरिआवाहक आहे व सांथीचा उगम त्या मुलापासून झाला असें समजतें. दुसरें उदाहरण:- उंदीर प्लेगचे जंतुबाहक आहेत व त्यांच्या जंतूंचा मनुष्यांत प्रवेश होतो; हे मोठ्या प्रमाणांत घडणाऱ्या गोष्टीवरून अनुभवास येतें. ऍनोफेलेस नामक डासामुळे मलेरियाचा ( कर्दमोत्थ विषाचा ) प्रसार होतो. हें मनुष्याचें शरिरा- वर घडणाऱ्या परिणामावरून स्पष्टपणें सिद्ध होतें. एका सांथीचें कारण शोधतांना त्या रोगासंबंधाच्या सर्व गोष्टींचें महत्त्व ओळखणे व त्याविषयी माहिती गोळा करणे किंवा त्यांची पद्धतशीरपणें व चौकसपणें तुलना करणें ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असें शेवटीं सांगणें आहे. असे मुद्दे पहात गेल्यास सांथींचा उगम सांपडणें बहुधा शक्य असतें; परंतु कारण समजलें नाहीं तरी निराश होण्याचें प्रयोजन नाहीं. कारण ज्ञानाचा प्रसार झाल्यावर नमूद करून ठेवलेल्या गोष्टींवरून रोगाच्या कारणाचा शोध भविष्य काळांत लागेल. सांथीसंबंधाच्या गोष्टी लिहून ठेवाव्या व त्यावर