पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ आरोग्यशास्त्र आपली नवी कल्पना लढवीत बसूं नये आणि काढलेल्या कल्पनेला स्थितिमान जुळतें असा ओढून ताणून संबंधहि जुळवूं नये. दूषित रोग्यास पृथक ठेवणे जिल्ह्याचें आरोग्य हें" इन्स्पेक्टरला " प्रत्येक स्पर्शसंचारी रोगाची स्वबर देण्याची सक्ति ठेविल्याशिवाय अंमलात येणार नाहीं. म्हणजे पहिल्या किंवा आरंभींच्या रोग्यांना दूर ठेवणें, व उत्पन्न झालेल्या जंतूंचा नाश करणें व रोग्याशेजारी वावरणाऱ्या लोकांच्या हालचालीचें निय- मन करणें ह्या गोष्टीं करितां येतील. खबर देण्याची सक्ति न ठेविल्यास रोग झाल्याची माहिती पडेपर्यंत त्याचा फैलाव होतो. व नंतर सतत प्रयत्न करून देखील पुष्कळ वेळां तो आवरत नाहीं व त्याचा दूरवर प्रसार होतो. खबर देण्यालायक आजारांची विस्तृत यादी करून त्यांत इन्फ्ल्यु- एंझा, सेरिब्रोस्पाशनल फीवर, संग्रहणी, हिमज्वर, संततज्वर, रिमिटंट फीवर, ) ग्लॅडर्स, उपदंश, पूयञ्चर (सेप्टीसिमिआ ), पर्य्युरा; क्षयग्रंथी, न्यूमोनिया व शीघ्रसंधिवात ह्या रोगांची नावें सामील करावीत. प्रति- बंधक उपाय स्पर्शसंचारी रोगांवरच चालतात असें नाहीं. म्हणून वेळे- सारख्या रोगांचा उत्पत्ति व परिणाम होतील. सर्व स्पर्शसंचारी रोग्यांना पृथक ठेवणे इष्ट आहे. परंतु सांथीचे रोग ज्यांत वाऱ्याबरोबर जंतूंचा प्रसार होतो त्यांचा प्रसार होऊं नये अशी इच्छा असल्यास त्यांना पृथक ठेवणे अत्यावश्यक आहे. परंतु गोवर ( मिजल्स ) ह्या रोगांत अडचण पडते. कारण स्फोटांचा उगम होण्यापूर्वीचे अवस्थेतदेखील हा रोग स्पर्शसंचारी असतो. म्हणून त्याचा पुरावा उठण्यापूर्वीच कदाचित् रोगाचे जंतूंचा प्रसार इतका विस्तृत व जगव्यापी असतो कीं, त्यापासून बचाव होण्याची