पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० आरोग्यशास्त्र खुल्या मैदानांत किंवा उघडया झोपड्यांत किंवा तंबूत आजा- यांच्या जखमा फार लवकर बऱ्या होतात, असें नेहमी पाहण्यांत 'येतें. शीघ्र स्पर्शसंचारी रोगांची अशीच गोष्ट आहे. कारण रोगप्रति - बंधक कार्यार्थ ताजी हवा कोणत्याहि औषधापेक्षां अधिक मौल्यवान् असते. रोग्यांना विपुल ताजी हवा मिळेल अशा तऱ्हेची आतुरालयाची बांधणी करणें व व्यवस्था ठेवणें हें अत्यंत महत्त्वाचें तत्व आहे. रोग्यांची त्वचा व फुप्फुसें ह्यांपासून निघणाऱ्या कुजकट वाफा व वायु ह्रीं निरोगी माणसापासून निघणाऱ्या त्या त्या पदार्थापेक्षां प्रमाणानें अधिक नसली तरी खात्रीनें अधिक घातुक असतात. असल्या वाफा व वायु ताज्या हवेच्या लोटांनी मंद केल्या पाहिजेत व जलदी बाहेर लोटल्या पाहिजेत. अभ्यंतर चिकित्सेच्या दालनांत [ मेडिकल वार्डमध्यें ] प्रत्येक रोग्याला १०० स्केअर फीट जागा एकंदर १००० क्यूबिक फीट जागा असावी. तेथील हवा दर घंटयाला तीन वेळां तरी बदलली जावी. म्हणजे दर माणशी प्रत्येक घंटयाला तीन हजार क्यूबिक फीट ताजी हवा आली पाहिजे. क्षयरोगी असलेल्या दालनांत जागेचें व ताज्या हवेचें प्रमाण जास्त पाहिजे. स्पर्शसंचारी रोग्यांच्या आतुरालयांत प्रत्येक रोग्याला १४८ स्क्वेअर फीट जागा पाहिजे, व एकंदरीत निदान २०० क्यूबिक फीट जागा हवी व जागेंतील हवा एका घंट्यांत तीन चार वेळां पालटली पाहिजे. दालनांतून रात्रीं विजेचे दिवे असावेत. तशी व्यवस्था नसल्यास Incandescent gas burners वापरावेत. सार्वजनिक आतुरालयांत ( जनरल हॉस्पिटलमध्यें ) प्रत्येक - दालनांतील रोग्यांचे संख्येचें मध्यम परिमाण ठेवणें सोईस्कर आहे.