पान:आरोग्यशास्त्र.pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आतुरालयें ( हॉस्पिटल्स ) २२१ व इतक्यावर एका दाईला देखरेख ठेवतां येते. तीस रोग्यांची सोय करण्यास दालनाची लांबी १२० फूट रुंदी २५ फूट व उंची १० फूट असावी. उंची बारा फूट असली तर अधिक चांगली.. १३ ते १४ फूटाच्या वरील उंची वातसंचाराचे [ व्हेंटिलेशन ] कमी उपयोगांत पडत नाहीं म्हणून जागेचे क्यूबिक फीट मोज- तांना दालनांची उंची ह्यापेक्षां जास्त असल्यास ती वजा घालून मापन करावें. ज्वराच्या आतुरालयांत ( फीवर हॉस्पिटलस् ) लहान दालनें करण्याची चाल वाढत चालली आहे. कारण त्यांमध्ये रोगमुक्ति लव- कर होते, व द्विजीत स्पर्शसंचार होण्याची भीति कमी असते. शिवाय रोग्याच्या तीव्रतेच्या व मुदतीच्या मानानें रोग्याचें वर्गीकरण करणें सोपें जातें. स्त्रियांचे दालनांत निरोगी मुले असतात म्हणून जागेचें प्रमाण जास्त ठेवावें. वातसंचार स्वाभाविकपणें होण्यासाठीं दालनाच्या खिडक्या समोरासमोर असून त्या जवळजवळ छतापर्यंत पोहोंचवाव्या. खिडक्यांचे उर्ध्वभाग आसांवर फिरणारी कमानदार स्वतंत्र लहान चौकट असावी. ती उघडी ठेविल्याने छतापर्यंत कलता वारा जातो. न्हाणीघरें, मुत्र्या, मैलापात्रे इत्यादि त्या दालनापासून दूर असावीत; व त्याकडे जाण्याची पडवी दालनाला जोडलेली व हवाशीर असावी. मैलापात्रे, ऍनॅमेलचीं, चिन्या मातीचीं अथवा अॅल्युमिनि- अमचीं असावीत. त्यांचा आकार मोठा असून त्यांचें द्वार १५ इंच स्केअर असून त्यांच्या भोंवतीं रुंद कड्याळ असावें. ह्यांत मलमूत्रादिकांचें विसर्जन करावें व तीं दिवसांतून अनेक वेळां धुवावी. दालनांची जमीन, भिंतीं व छत ह्यांचे पृष्ठभाग घोटीव व तुळतुळीत असावेत. त्यांत भेगा, छिद्रे बिलकुल नसावीत. खुल्या