पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ पाणी त्यांचे कूपजलांत अस्तित्व समजतें. ह्या कामाकरितां खाण्याचे मीठ, लिथीआ सॉल्ट, फ्ल्युओरोसिनचे आल्कलीमधलें द्रावण, पॅरॅफिन तेल अथवा बॅसिलस प्रॉडिजीओसस चें द्रावण वापरतात. शौचकूप अथवा ज्या जागेचे पाणी विहीरींत पोहोचत असेल अशी शंका येईल, त्या ठिकाणी हे पदार्थ ओततात व तर्क खरा असल्यास झिरपणाऱ्या पाण्या- बरोबर खाली जाऊन हे पदार्थ विहिरीचे पाण्यांत आढळतात. फ्ल्यु- ओरेसिन हें विशेषेकरून सोडिक हैड्रेटशीं समभाग मिसळून वापरतात. हा पदार्थ एक गुंजभर घेऊन ५००० शेर पाण्यांत घातला तर, त्याला समजेसा हिरवा रंग येतो. तरी पण त्यापासून कसलाहि अपाय घडत नाहीं. जेव्हां आसमंतांतील खुल्या जागेंत असणारे जंतू कूपजलांत आल्याची शंका येते, त्या वेळी बॅसिलस प्रॉडिजीओसस हे आसमंतांत पसरतात व त्यांचा प्रवेश विहिरींत होतो कीं काय हें पाहण्यांत येतें. खोल विहिरी-मृदु भागांतून खणल्यावर पुढे खाली खडू, वाळूदार खडक इत्यादींतून खोल खणून काढलेल्या विहीरींना खोल विहिरी म्हणतात. उथळ भागांतील वाळू व कांहीं जाडीचा अभेद्य खडक फोडून त्याचे खाली लवकर पाणी लागलें तरी, त्या विहिरीला खोल विहीर म्हणतात. खोल विहिरींचा वरील भुसभुशीत जमिनींतून गेलेला भाग विटा, दगड व सिमिटानें बांधून काढावा. म्हणजे पृष्ठ भागावरील पाणी आंत पाझरून जाणार नाहीं. व आंतील पाणी बिघडण्याचा संभव जवळ- जवळ नाहीसा होईल. हे कूप शहरांत असले तरी त्यांत प्राणिज पदार्थ शिरत नाहीत. विहिरीवर छिद्रयुक्त पत्र्याचें झांकण असावें. सहा सहा महिन्यांनी विहिरी उपसून त्यांतील गाळ काढावा व त्या स्वच्छ कराव्या. विहिरींत उतरण्याचे अगोदर त्यांत जळती मेणबत्ती सोडावी; ती विझली नाहीं तर त्यांत कॅर्बानिक अॅसिडवायु घातक प्रमाणांत नाहीं असें सम- जून त्यांत उतरावें. पण मेणबत्ती विझल्यास जिवाला धोका आहे असें समजून तींत उतरूं नये.