पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ आरोग्यशास्त्र हवेच्या खालोखाल ह्या गोष्टीचें महत्त्व आहे. प्राणिज वाफा पदार्थ ब भिंती इत्यादींना चिकटून बसूं नयेत. गतकाली जमीन व भिंत इत्यादींच्या भेगांत प्राणिज पदार्थ, पोल्टिसांचे व खपल्याचे कण जमत, व त्यामुळे धांवरें, पायोमिया इत्यादि रोग असत. दालनांतील जमीन पाण्याने धुऊं नये. कारण पाण्याच्या बाष्पीभवनाने त्यांतील - हवा सर्द होते. दालनांचे कोपरे गोल असावेत. कोनदार नसावेत. म्हणजे ते लवकर साफ करावयास सांपडतात. खाटा लोखंडाच्या असून त्यांच्या बैठकीवर तारांची जाळी असावी. दालनांत सामान शक्य तितके कमी ठेवावे. उत्सर्जित पदार्थ, थुंकी, सोडलेल्या घाणेरडया पट्टया, पोल्टिस इ. पदार्थ बाहेर काढण्याचे काम दिवसांतून पुष्कळ वेळा करावें. स्पर्शसंचारी विकाराच्या दालनांतील घन प्रकारचे त्याज्य पदार्थ जाळून टाकावेत. उबराच्या आतुरालयांतील मोत्यांचे पाणी सार्वजनिक मोऱ्यांत सोडल्याने व उत्सर्जित पदार्थ लहान मोयांच्या वाटें अन्य मोठ्या मोऱ्यांत जाऊं दिल्याने अपाय घडल्याचे दृष्टीस पडत नाहीं. व्यायामासाठी, इमारतीच्या दक्षिण अगर पश्चिम अंगास पडव्या ठेवाव्या व बागेची सोय करता आली नाही तर इमारतीवरील छप्पर झुकर्ते ठेवू नये. प्रत्येक गांवाला स्पर्श- संचारी रोगी पृथक ठेण्यासाठी आतुरालय असावें. हो आतुरालयें . गांवाच्या अगदी बाहेर असावीत. किंवा आंत ठेविल्यास तुरळक वस्तीत, मोकळ्या विस्तीर्ण जागेंत बांधावीं. त्यांची दारे पूर्वपश्चिम बाजूस असावीत. म्हणजे सूर्यकिरणांचा प्रवेश आंत होतो. एका मोठ्या इमारतीपेक्षां पृथक् पृथक दालने बांधावी म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे रोगी विभक्त ठेवतां येतात. निरनिराळी दालने खुल्या पडव्यांनीं एक- मेकांस जोडावीत. आतुरालयाच्या भोवताली निदान २५ हात मोकळी जागा असावी. वस्तीच्या दर हजारी माणसांला एका खाटेची व्यवस्था