पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ आरोग्यशास्त्र स्वोल्या करण्यापेक्षां त्या चौकाच्या भोंवतीं अथवा बहुतेक बाजूंनीं खुली हवा मिळेल अशा रीतीनें बांधाव्या. म्हणजे वाताभिसरण चांगलें होतें. व मधूनमधून गोंगाट होण्याचे टळून मुलांची एकतानता बिघडत नाहीं. सर्व वर्गांत चांगला उजेड चहूंकडे असावा. पण डोळे दिपूं नयेत अशी व्यवस्था ठेवावी. प्रत्यक्ष ऊन आंत येऊं देऊं नये म्हणून खिडक्यांना पांढऱ्या कपड्याचे सरक पडदे लावावे. दिव्याच्या उजेडाने डोळे दिपूं नयेत अशी व्यवस्था ठेवावी. घासून खरखरीत केलेल्या चिमण्या वाप- राव्या. एक फूट अंतरावरून " स्मॉल पायका " आकाराचीं अक्षरें सहज वाचतां यावत इतका उजेड असावा. खिडक्या दरवाजाच्या ते आकाराच्या असाव्यात. त्या जवळ- जवळ छतापर्यंत पोचाव्या. वर्गात उजेड भरपूर असला पाहिजे. कमी उजेड असल्यानें हस्व दृष्टी (शॉर्ट साइट ) उत्पन्न होते. एक फूट किंवा अधिक अंतरावरून वाचतां न आल्यानें मुलें टेबलावर वाकून वाचं लागतात. पुस्तक फार जवळ आणल्याने डोळे नाकाकडे वळतात. ह्यामुळें नेत्रांवर स्नायूंचा दाब पडतो. व लवचिक असे नेत्रगोल दवून त्यांचा पूर्वपश्चिम व्यास लांब होतो व हस्व दृष्टी जडते. म्हणजे दृष्टीस पड- णाऱ्या पदार्थाची प्रतिमा रेटीनाच्या पलीकडे पुढील अंगी पडते व पदार्थ पुसट दिसतात. वर्गात दर विद्यार्थ्याला किमान पक्ष १०० क्यूबिक फूट जागा व १० स्क्वेअर फूट जमिनीचा पृष्टभाग वांटणीला यात्रा. ह्याच्या दिढीनें किंवा दुप्पटीने जागा असणें चांगलें. वर्गात वाताभिसरण विपूल होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. बाहेर पडणारी हवा एकदम बाहेर खुल्या हवेंत जावी. खिडक्या उघड्या ठेवाव्या. श्वासोच्छ्रासानें कॅर्बानिक अॅसिड वायु बाहेर पडतो. त्याप्रमाणे वाफ व प्राणिज पदार्थ उच्छ्रासाबरोबर