पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २२५ व अन्य रीतीनें बाहेर पडतात. ह्यांनी दूषित झालेलीं हवा हुंगण्यात आल्यास शारीरिक व मानसिक क्षीणता उत्पन्न होते. वर्गाच्या भिंती चुनेगच्ची कराव्या, म्हणजे त्या धुतां येतील; किंवा त्यांना करडा अथवा हिरवट रंग द्यावा. बाकेँ व मेजें एकमेकांशी समांतर ठेवावी. उज़ेड विद्यार्थ्याच्या डाव्या बाजूनें येईल अशा रीतीनें बसण्याची व्यवस्था करावी, म्हणजे हाताचा अंधेर पुस्तकांवर पडणार नाहीं. उजेडाच्या किरणाने डोळे दिपूं नयेत. उजेडाचें आधिक्य हाताच्या उजव्या बाजूस असल्यास लिहितांना कागदावर पडछाया पडते. मेजाची रुंदी १५ ते १८ इंचांची असावी. लिहितांना त्याचा ढाळ १५ अंशांचा व वाचतांना ४५ अंशांचा असावा. बाकादि बैठकीची उंची विद्यार्थ्यांच्या तळव्यापासून गुडघ्याच्या उंची इतकी असावी. मेजाच्या कडेपासून परपेंडिक्युलर काढलेल्या रेषेपासून बैठकीच्या पुढील कोरेचें अंतर एक इंचापेक्षां जास्त नसावें. बैठकीची रुंदी मांडीच्या असावी. बैठकीची पुढील कड गोल करावी. वर्षांतून दोन वेळां मुलांच्या सोईची बैठकीची व मेजांची व्यवस्था करावी. बैठकीची पाठ उभी सरळ असावी. कुल्ले व कमरेच्या माकड- छाडापासून बावट्याच्या अस्थिपर्यंत पोहोंचतील अशा वक्र उशा असाव्या. लहान मुलांनीं मेजाशीं फार काल सारखे बसूं नये. अभ्यास थांबवून त्यांना अल्प काल सुटया देत जाव्या. फळे उजेडाच्या जागीं मांडावे. त्यांचा पृष्ठभाग चमकदार नसावा. त्यांवर अक्षरें विरळ विरळ लिहावींत. मुलांना वाळू व कोळसा ह्यांच्या हौदांतून गाळून घेतलेले पाणी पिण्यास द्यावें व स्पर्शजन्य रोगांच्या प्रतिकारार्थ वापरल्यावर ती वाहत्या पाण्यांत धुवावीं. तीं रोज घासून स्वच्छ ठेवावीं. मुलांना खुल्या हवेंत भरपूर कवाईत मिळणे आवश्यक आहे. पावसाच्या झडीच्या वेळी मोठ्या मंडपांत १५