पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ b आरोग्यशास्त्र व्यायाम करवावा. मुलांची वैद्यकीय तपासणी योग्य रीतीने झाल्यास शारीरिक उणीवा लवकर ध्यानांत येतात व योग्य प्रकारच्या व्यायामानें त्या दुरुस्त होतात. शाळेच्या भोवतालची जागा स्वच्छ व साफ ठेवावी. तेथें केर- कचरा व कसलीहि घाण करूं नये. शौचकूप धुवून व सांडपाणी रोजच्यारोज हालवून शाळेच्या तासांत रोज निदान दोनदां साफ ठेविले पाहिजेत. मुलांनीं पाहिजे तेथें मूत्रविधी करूं नये. त्यांच्याकरतां संख्येच्या मानानें मुत्र्या बांधाव्यात. व प्रत्येक मुत्रीला पाण्याची तोटी असावी. शाळेच्या अतिबाहेर चोहोंकडे स्वच्छता, टापटीप इतकी असावी की, ती त्यांना आरोग्यदायक नियमांचा धडा व्हावा. विपुल बाताभिसरण, स्वच्छता व व्यायाम ह्यांवर विद्यार्थ्यांचे चालूं व भावी यशापयश अवलंबून असतें व शिक्षकांचा लौकिक मुलांच्या तयारीवर असल्यामुळे ह्या गोष्टीकडे त्यांनी चांगले लक्ष पुरवावें. शाळा सुटल्यावर सर्व दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवाव्या. भुया, भिंती, पडव्या, जिने सर्व ओल्या केलेल्या केरसुणीने झाडाव्या. जमिनी आठवड्यांतून दोन वेळां सारवाव्या. विशेषतः लहान बालकांचे वर्ग अधिक वेळां स्वच्छ करावे, व त्यांचे निर्जंतुकरण करावें. प्रत्येक शनिवारी वर्गाची जमीन, सर्व भिंती, बांके, मेर्जे, दोर, खुंटया वगैरे सर्व जागांना व पदार्थांना धुण्याच्या सोड्याचें व पिवळ्या साबणाचें कढत द्रावण पुष्कळ लावून धुवावे. नंतर धुतलेल्या पदार्थांवर कृमिघ्न द्रव्याचें थोडें द्रावण शिंपडावें. दगडी कोळशापासून काढलेलें ऐझल सिटिन प्रकारचें एकादें जंतु- नाशक द्रव्य ध्यावें. दर पंधरवड्याला संबंध इमारत वरप्रमाणें स्वच्छ धुवावी. दर महिन्यास कपाटें, पुस्तकें ठेवण्याच्या फळ्या, कडीपाट वगैरे साफ करावी व पुस्तक, नकाशे वगैरे उन्हांत ठेवावे.