पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २२७ प्रत्यक्ष मुलांविषयीं सूचना ६ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांना शाळेत जाण्याची सक्ती आहे. आंधळ्या, मुक्या इत्यादि व्यंग मुलांचीं शाळेत जाण्याचीं वयमानें १६ वर्षापर्यंतची पाहिजेत. मेंदू व मज्जातंतूंचा संज- ह्यांमध्ये मनाचें वास्तव्य असतें. त्यामुळे चेतनांचें ग्रहण होऊन, शस्त्रिंतील सर्व जैवी क्रियांचे नियमन होते व स्नायूंवर प्रभुत्व राहून त्यांना गतीसंबंधी आज्ञा मिळते. म्हणून मज्जातंतूंचे संजांचा अभ्यास शिक्षकाने अवश्य व काळजीनें करावा. चुकीच्या अथवा नेभळट क्रिया प्रथम मनाच्या ताब्यांत अस- तात. परंतु पुढें त्यांविषयीं लक्ष अल्पांशाने किंवा सर्वस्वीं नष्ट होऊन त्या सवय होऊन बसतात. म्हणून सुविचार व चांगल्या कृति कर- ण्याचे वळण लावण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता असते. अरोगी स्थितीत देखील मुलामुलांत पुष्कळ फरक असतो व मानसिक व बौद्धिक उन्नतीसाठी प्रत्यकाच्या मेंदूच्या बलच्या वाढीकडे लक्ष पुरवावें लागतें. मेंदूच्या क्रियासमहाला अल्प वयांत थोडें उत्तेजन दिल्यास व बाल्यावस्थेत अधिक उत्तेजन दिल्यास मेंदूचा सर्व संज कमजोर होतो व शेवटी मेंदूची व एकंदर शरिराची वाढ व आरोग्य यांना अपाय होतो. म्हणून शिक्षणाचे सर्व हेतू अशानें विफल होतात. कष्टातिशयापेक्षां चुकीचे काम अवेळीं व चुकीच्या मार्गानें केल्याने मानसिक थकवा उत्पन्न होत असतो. हृदाच्या ठोक्यांचा जोर व रक्ताचा दाब थोडासा वाढतो व स्नायूंची शक्ती व स्पर्शज्ञान कमी होते. बेरजा, शुद्धलेखन इ. घालून थकव्याची तपासणी करितां येते. मानसिक अथवा श्रमातिशयाच्या सामान्य व हंगामी भावनाः-जांभया, थकवा, चंचल दृष्टी, दुर्लक्ष, झांपड, आज्ञा व प्रश्नाला