पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ आरोग्यशास्त्र सावकाश किंवा चुकीचें उत्तर देणे. मस्तकाचा तोल संभाळण्यांत फरक. 1. • मानसिक थकव्याच्या चिरकालिक व असामान्य भावना:- मुख्यतः बोटें, डोळे व मुख ह्यांच्या स्नायूंचीं अनियमित चलने, कपाळाला आठ्या घालणे, कपाळाच्या स्नायूंचें क्रियाधिक्य, शरीर व मुख्यतः डोक्याचा तोल संभाळण्याची स्नायुशकत न्यूनता, परावर्तित क्रियांचे आधिक्य होते. हात लांब करण्याची आज्ञा केल्यास अंगठा व बोटें किंचित् गळाल्यासारखीं दिसतात. अस्वस्थता, शरीर व मानेचे स्नायू उडणें, इत्यादि प्रकारच्या मज्जातंतूंसंबंधी भावना होतात. स्पर्शज्ञान कमी होतें. चिडखोरपणा, कुरकूर करणें, रागें भरणें न सोसणें अशा भावना होतात. चेहरा चिंतातुर व चर्या थकल्यागत दिसते. तोंड उघडें रहातें. खालच्या पापण्या ढिल्या असतात. 'थर्कत्रा, मस्तकशूळ, श्रम न सोसणें, मृदुपणा, प्रश्न, अथवा आज्ञेची उमज मंदतेनें किंवा अस्पष्टपणें होणें, ह्या भावना असतात. झोपाळूपणा व ताटकळ, झोपेंत भिर्णे, झोपेंत चालणे, शरिराच्या वाढीस न्यूनत्व व प्रकृतिक्षीणत्व हीं चिन्हें होतात. कोरिआभूतोन्माद व अपस्मार होण्याच्या कारणांपैकी मानसिक थकवा हें एक कारण आहे. 1 मानसिक श्रमाने खालील प्रकृतीच्या मुलांना अपाय होण्याचा संभव असतो. चिडखोर, रागीट व उद्वेगयुक्त तामसी प्रकृतीचीं मुलें; फिकट, कदान्नभक्षक, वेगानें उंच होणारीं व फाजील हुशारी दाख- विणारी मुले अशुद्ध हवेंत व रोगट परिस्थितीत राहणारी, अभ्यासाची जिकीर असलेली मुलें; चुकीचें शिक्षण मिळणारी, निद्रा व व्यायाम अपुरे मिळणारी, दृष्टी, श्रवण, इत्यादि कमी झालेलीं, दृष्टीवर अधिक ताण पडत असलेलीं व यौवनावस्थेचा आगम होत असलेली मुळे इत्यादींना मानसिक श्रमापासून नुकसान पोहोंचण्याची भिती असते.. 4