पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २२९. मानसिक थकव्याचे प्रतिबंधक उपायः- आरोग्यकारक वेळा- पत्रक हा सर्वांत मोठा उपाय आहे. मेंदूच्या शक्तीचा मितव्यय करून योग्य मार्गानें खर्च करावी. विषयाच्या मानानें त्याला वेळ द्यावा. परंतु कोणताहि विषय पाऊण तासापेक्षां जास्त शिकवू नये. विषयांच्या क्रमाची व भिन्नतेची योग्य व्यवस्था असावी. मुलांच्या वाढीच्या स्थिती- कडे चांगले लक्ष पुरवावें; व शाळेच्या आयुष्यांतील आरंभीच्या वर्षांत मेंदू अपक्क व अस्थिर असतो हे ध्यानांत ठेवावें. विसांवा, करमणूक, व्यायाम व फराळ ह्याला शाळेच्या वेळांत पुरेसा अवसर मिळावा. ताजी हवा व शांतता असावी. ठरलेल्या धड्यांपेक्षा अधिक शिकवूं नये. घरीं करण्याचा अभ्यास थोडा असावा, एक तासभर असावा.. तेथें नुसती उजळणी करावी. दहा वर्षांच्या खालच्या मुलांना मुळींच नसावा. मेंदूची क्षीणता होण्याचे अगोदर चाणाक्ष शिक्षकांच्या लक्षांत पूर्वचिन्हें येतात आणि दृष्टी व श्रवणाच्या कमतरतेने होणारा मेंदूवरील ताण व थकवा त्यांच्या ध्यानांत येतो. : श्रवण व दृष्टीची न्यूनता, कदान्नभक्षण, शिक्षणाच्या पद्धतीत न्यूनता, आजार, वाईट हवा, अपुरा व्यायाम अथवा झोंप ह्या भाव- नांनी मुलांमध्ये मंदपणाचा भास होतो. मानसिक कमतरता म्हणजे बुद्धि कोती असल्याने अभ्यासांत गती थोडी होते. स्वभाव लहरी असतो व नीतिमत्ता चमत्कारिक असते. मानसिक कमतरतेचा अर्थः-- निव्वळ बुद्धिमांद्य नव्हे. मान- सिक कमतरता असलेल्या मुलांत स्वतःच्या व वर्गबंधूंच्या फायद्या- करतां साध्या शाळेतून काढून सुतारकाम व लोहारकाम इ. हस्त- कौशल्य देणाऱ्या संस्थेत ठेऊन त्यांच्यावर नित्याची नजर व धाक ठेवला पाहिजे.