पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० आरोग्यशास्त्र वर्ल्ड ब्लाइंडनेस असणाऱ्या व वेडगळ मुलांच्या शिक्षणाची स्वतंत्र सोय केली पाहिजे. कोरिआ ( सेंट व्हैटस डॅन्स) हा विकार ७ ते १४ वर्षांच्या मुलांना होतो. रोगाचें आक्रमण मंदतेनें होतें. चेहेरा, हातपाय इत्यादि भागांना नेहमी हिसका मारल्याप्रमाणें गति असते. सरळ चाल गं येत नाहीं. स्नायूंवर प्रभुत्व न राहिल्यानें हातांत धरलेल्या वस्तू गळून पडतात. मुलाचें वजन सामान्य प्रमाणापेक्षां कमी असतें. भूतोन्मादः -- हा विकार यौवनावस्थेच्या सुमारास विशेषतः लहरी व उद्वेग असणाऱ्या मुलींत होतो. मानसिक उद्वेग, गळ्यांत गोळा येऊन गुदमरणें, हस्तपादादि लटके पडणें इत्यादि भावना होतात. झटके मंदतेनें येतात. स्फुंदर्णे, हास्य इ. मानसिक उद्वेग त्या वेळीं दृष्टीस पडतात. नंतर मोठी किंकाळी फोडून, जोरानें आंत्र के येऊन बाह्यतः बेशुद्ध स्थितींत पडते. ती बहुधा स्वतःला इजा करून घेत नाही. व तिचे जिव्हेस इजा होत नाहीं. अपस्मारः कचित् वेळीं मुंग्या येणे, चक्कर येणे इत्यादि पूर्व चिन्हें होतात. बहुधा चेहऱ्याचे स्नायू क्षणमात्र ढिले पडून एकाएकी बेशुद्धि येते. आंग ताठ पडतें. जीभ चावली जाते. हाताच्या मुठी वळतात. हस्तपादांचे व मुखाचे स्नायूंना आचके येतात. रक्तसंचयामुळे चेहरा विरूप व विकर्ण होतो. झटका संपल्यावर मस्तक सुंभ होतें. पुरेसा विसावा, करमणूक व शरिरास योग्य कसरत देणें ह्यांची 'आवश्यकता इंद्रीय व्यापारांच्या सुरळीतपणासाठीं अमते हें ध्यानांत ठेवले पाहिजे. ह्यांनी मेंदूच्या अव्यवस्थितपणाची चिन्हें करणाऱ्या मुलांची, व दगड अथवा मठ्ठ मुलांची संख्याहि कमी होते. झोपेचा गाढपणा व कामान ह्यांचा मेंदूचें काम करण्याच्या शक्तीवर फार मोठा परिणाम होतो. मेंदूचे त्याचप्रमाणें शरिराचे इतर