पान:आरोग्यशास्त्र.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २३१ भागांचे पुनः स्थापनेस व वाढीस निद्रेची आवश्यकता असते. झोपेच्या कमतरतेनें मानसिक लठ्ठपणा किंवा क्रियाहीनत्व व कोती वाढ होते. शाळेच्या वयोमानांत निद्रेच्या इष्ट प्रमाणाचें कोष्टक खालीं दिले आहे. वयाचा आंकडा ४ ते ८ ९ ते १२ १२ ते १४ ... ११ ते २० निद्रेचे तास ... १२ ११ ... ९ ते १ ९ वातसंचारित, स्वच्छ, शांत निद्रागृह, अंधेर, ऋतुमानाप्रमाणे कमी- जास्त उबदार बिछाना हीं गाढ, सुखाची निद्रा घेण्यास अनुकूल अशी कारणें आहेत. बालकांच्या मज्जातंतूंची वाढ शैक्षणिक दृष्ट्या एक महत्त्वाची बाब आहे. बाल्यावस्थेत ३ ते १० वर्षांपर्यंत मेंदूचे संजांत स्थीरत्व नसतें. तो वेगाने वाढतो, पण जलदी दमतो. मेंदूच्या व शरिराच्या स्थितीचा परस्पर परिणाम घडत असल्यामुळे मेंदूला अतिशय काम पडल्यास शशिला अपाय होतो व देहास अतिशय कष्ट पडल्यास मेंदूस अपाय होतो. पांचव्या वर्षांपर्यंत मुलांना ज्ञानेंद्रियाचे द्वागं शिक्षण चावें. पुढें स्मरणशक्ति वाढवावी व चांगली चालरीत शिकवावी. दहा वर्षांच्या पुढें मुलांची विचारशक्ति व तर्क वाढतात. बहुधा ५ ते ८ वर्षांपर्यंत स्वभाव बनतो. लहान मुलें फार अनुकरणशील, वाहवा करून घेण्यास उत्सुक व चढाओढ करण्याचा प्रयत्न करतात, हें ध्यानांत ठेवलें पाहिजे. साहजिक- पर्णे त्यांच्या ठायीं जिज्ञासा फार असते. त्यांच्या शारीरिक व मानसिक क्रिया अविश्रांत चालू असतात. ह्या क्रिया मर्यादेत ठेऊन शारीरिक,