पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ आरोग्यशास्त्र पाण्याचा बर्च गांवाला पाणी शुद्ध व विपुल असलें पाहिजे. त्याशिवाय आरोग्य राहणार नाहीं. वस्तीपैकीं दर माणशीं सुमारें ५ घागरी पाणी घरांतील खर्चासाठीं पुरें होतें. कारखान्याचे कामाला निराळें लागेल. शिवाय म्युनिसिपलिटीला रस्ते धुणे, आगी विझविणे इत्यादि कामाला निराळें पाणी लागेल. जलशुद्धि पिण्यास व खर्चात्रयास नेहमीं शुद्ध पाणी पाहिजे; निदान पिण्याला तरी पाहिजे. त्यांत कसलाहि बाह्य अगर अपायकारक पदार्थ असतां कामा नये. निसर्गतः प्राप्त होणारे सर्व पाण्यांत ह्या प्रकारचीं द्रव्यें असतात. व ह्रीं दूर करण्यासाठीं शुद्धि करणाऱ्या अनेक तऱ्हा योजतात. बाह्य पदार्थांचे खनिज व प्राणिज असे मुख्य दोन वर्ग आहेत. उदकाला काठिण्य आणणारे पदार्थ काढून टाकणे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे आहे. खनिज पदार्थ फार असल्यास पाणी फार बेचव लागतें व कधीं कधीं प्रकृतीला अपायकारक असतें. ह्या कारणासाठी देखील बाह्य पदार्थ दूर करण्यास्तव जलाचें शोधन करावें लागतें. पाण्यांत मिसळलेले किंवा विरघळलेले प्राणिज पदार्थ अलग करणें हें दुसरें व अधिक महत्त्वाचे काम आहे. जलाचे शुद्धीचे तीन प्रकार आहेत: - (१) गाळणे, (२) आधण आणणे, (३) रासायनिक द्रव्ये वापरणें. शुद्धि करण्याचे ज्या कृतीचे मोठ्या प्रमाणावर अवलंबन करून मोठ्या गांवाचें पाणी शुद्ध करतात त्या कृति पुढे लिहिल्या आहेत. जलाचे उगमस्थानीं व अशुद्ध होण्याचे पूर्वी तें धरून आणण्याचा प्रयत्न करावा. हें न साधल्यास गांववाल्यांचे हाती पडण्यापूर्वी तें शुद्ध केलें पाहिजे. जो तो पाहिजे तर पाणी शुद्ध करून घेईल असें म्हणून कर्तव्याची हयगय करणें बरोबर नाहीं.