पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ 'आरोग्यशास्त्र नौतिक व मानसिक शिक्षणाच्या प्राप्तीसाठी त्यांना योग्य वळण दिलें पाहिजे. अधाशीपणा, मिथ्या भाषण इत्यादि उणिवांकडे कल दिस- ल्यांस त्या वेळेवर दाबून टाकल्या पाहिजेत. क्रिया करण्याच्या इच्छेचा प्रथम आविर्भाव होतो व क्रिया त्यागाचा नंतर होतो. दृष्टीः- बाल्यावस्थेत नेत्रगोलाच्या पुढून मार्गे लांबीचे प्रमाण कमी असतें. नेत्रांसंबंधी स्नायूंच्या क्रियांनीं ही उणीव भरून काढावी लागते. ह्यामुळें नेत्र थकतात, व मज्जेच्या संजांवर ताण पडतो. शिवाय पूर्णत्वास पोहोचणारे रेटिनाचे मज्जातंतू थकतात. ह्या वयांत नेत्र मृदु व लवचिक असतात व दृष्टीच्या वैगुण्यास अनुकूल स्थितीचा त्यावर सहज परिणाम घडतो. 1 1 निदान शेंकडा २० विद्यार्थ्यांच्या दृष्टींत न्यूनता असते व शेंकडा १० मध्ये तर ती फार असते. म्हणून शाळेंतील कामाला दृष्टीच्या विकाराने मोठा अडथळा होतो, हे ध्यानांत येईल. दृष्टीच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर ताण पडतो. ह्या ताणाचा परिणाम मेंदूवर होऊन समज- शक्ति कमी होते. ह्याशिवाय मेंदूचे थकव्यामुळे शरिरावर अनिष्ट परिणाम घडतो. खालील कारणांनी मेंदूवर ताण पडतो. चिरकाल अविरत वाचनादि, नेत्रक्रिया, वेळापत्रकाची अविचाराची मांडणी, बारीक व अस्पष्ट काम, डोळ्यांचे निकट काम करणें, लिहितांवाचतांना शरिरार्चे अयोग्य आसन, अशक्तता, अशुद्ध हवा, कृत्रिम उष्णतेचें आधिक्य, ब अपुरें अन्न ही दूरचीं प्रावण्य कारणें आहेत. क्रमिक पुस्तकांच्या छपाईचा दृष्टीवर मोठा परिणाम होतो. अगदी लहान मुलांचीं पुस्तकें डबल पैकामध्यें छापावीं व त्याहून मोठ्या मुलांचीं 'पैका , लेडेड ' मध्ये असावी. दृष्टीच्या न्यूनतेच्या खालीं लिहिल्याप्रमाणें भावना होतात:- मस्तकशूळ विशेषतः ललाटशूळ असतो तो रात्री जास्त असतो. झोंप