पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ आरोग्यशास्त्र ऍस्टिग्मॅटिजम्:- नेत्रांची ठेवण प्रमाणहीन असल्यानें कोण- त्याहि अंतरावरून पदार्थ अपुरे अस्पष्ट दिसतात, ही उणीव असते.. हिच्याबरोबर कित्येक वेळां लंब किंवा हस्व दृष्टी असते. काणे डोळे (स्किट ) :- दोन्ही नेत्रांचे फोकस भिन्न असल्यानें व नेत्रांच्या कांहीं स्नायूंना विशेष ताण बसल्यानें हा रोग होतो. तिरवे- पणा बहुधा तिसऱ्या वर्षी येतो. नाकाच्या लगतच्या नेत्राच्या भागीं तिरवेपणा असल्यास बहुधा लांब दृष्टीहि असते. काण्या डोळ्यानें कमी दिसतें व भीतिप्रद संकर्णव्याधी (Complication ) होऊं नये म्हणून लवकर उपाय केले पाहिजेत. ह्या विकारासाठी चष्मे वापरल्याने नेत्रांना अशक्तता न येतां ते सुदृढ होतात. त्यांच्यामुळे दृष्टीचा उपयोग जपून होतो; मस्तक दुखत नाहीं, काणेपणा येत नाहीं पण झालेला असल्यास बरा होतो. - रंगांध्य ( कलर ब्लाइंडनेस ) : -- तांबडा व हिरवा ह्यांतील अंतर अशा लोकांना समजत नाही. अभिष्यंद:-डोळे येणें ( Conjunctivitis अथवा Opthalmia ) नेत्रांची आरक्कता, पापण्यांच्या कोरेस चिपडे येणें, पापण्या वाळणें, तेजोड - सहनता, पाण्याची गळ, पू येणें ह्या भावना अभिष्यंदांत असतात. उपजत शब्दांधः - ह्या विकारांत दृष्टीसंबंधी मेंदूचा भाग प्रमाणाबाहेर मंद असतो. विद्यार्थ्याला शब्दाची अथवा अक्षराची दृष्टी- विषयक आठवण नसते. अक्षरासारखे पदार्थ मेंदूला मंदतेनें समज- तात. ह्या विकारामुळे हिणवाचणें लवकर येत नाहीं. दृष्टीची परीक्षा स्नेलेनच्या तक्त्यांनी करतात. ह्यांवर मोठ्यां- पासून लहान अक्षरांचे शब्द अनुक्रमें छापलेले असतात. वीस फूट अंतरावरून सहावा आंकडा घातलेल्या ओळीवरील अक्षरें सहज वाचतां