पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २३५ आली तर दृष्टी मध्यम समजावी. ह्याहीपेक्षां दृष्टी कोती असल्यास चष्मा वापरला पाहिजे. प्रथम नांव घालतांना मुलांची दृष्टी तपासावी. आणि पुढे दरसाल एकदां पहात जावी. पापण्या मिचकावणें, कपाळाला आठ्या घालणें, नेत्रांची तिरपी किंवा पुढे गती होणें इ. चेहऱ्यावर कांहीं फरक होतो की काय हें लक्षपूर्वक पाहावें. रंगांध्य तगण्यास निरनिराळ्या रंगांचे कागदाचे तुकडे एकत्र करावेत व त्यापासून हिरवा व तांबडा वेंचून काढावयास सांगावे. दृष्टीचा मितव्यय व्हावा म्हणून क्रमिक पुस्तकें खालील नियमा- नुसार असावीत. कागद जाड असावा. अक्षरें मोठीं, रुंद व स्पष्ट असावी.. अक्षरे, शब्द व ओळी योग्य अंतरावर असाव्या. पानाच्या कोऱ्या कडा मोठ्या असाव्या. शाई काळी असावी. कागद पांढरा किंवा जरा पिवळट असावा. बारा इंचांपेक्षां अधिक जवळ पुस्तक धरावें लागेल. इतक्या लहान अक्षरांर्चे पुस्तक मंजूर करूं नये. कारण फार लहान मुलांना "" डबल पायका, ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना " पायका लेडेड " व त्याहून मोठ्या मुलांना " स्मॉल पायका लेडेड " ह्या आकाराच्या अक्षरांत छापलेली पुस्तकें पाहिजेत. स्पष्टीकरण, सूचना इ० लहान चालतील. <6 श्रवण:-( Hearing) विद्यार्थ्यांपैकी शेकडा बहुधा १२ ते २० वर्षांपर्यंतच्या मुलांचे श्रवणेंद्रियांत न्यूनता असते. श्रवणैद्रियाची न्यूनता व कर्णरोगाची चिन्हेंः-बोललेले शब्द अथवा आज्ञा मुलांच्या लक्षांत येत नाहीत. वर्गांत प्रयत्नपूर्वक लक्ष देणें, लक्ष न पोचर्णे, मंदपणा, धड्यामुळे लवकर कंटाळा येणे, तोंड उघडून श्वासोच्छ्रास घेणें, कर्ण - शूल, मस्तकशूल, कर्णस्राव, चक्कर, अशक्तता इत्यादि भावना होतात. ह्या विकाराची कारणें: -- ऍडेनाइडस व मेंडक्याची वृद्धि, नाक किंवा घसा ह्यांच्या दाहामुळे मध्यकर्णामध्यें विद्रधी होणे, कानांत मळ