पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ आरोग्यशास्त्र सांठणे. बहिरेपणामुळे मुक्या मुलांपैकीं शेकडा ६० जन्मापासून मुके असतात. शाळेत नांव घालतांना कान तपासावे व पुढें दरसाल एकदा तरी पहावें. दृष्टी व कर्ण ह्यांच्याकडे वेळेवर लक्ष दिल्यानें त्यांचे रोग बरे होतात. किंवा वाढत नाहींत व मुलांचे अभ्यास बुडत नाहींत व पुढील आयुष्यांत व्यंगें राहण्याचे प्रमाण बहुधा कमी होतें. व्यायामः – एकंदर शरिरापैकीं पाव हिस्सा रक्त स्नायूंमध्ये असतें. तें सक्रिय झाल्यास रुधिराभिसरण वेगाने चालते. म्हणून शरिराचे पोषणांत स्नायूच्या क्रियेचा मोठा परिणाम होतो. व्यायाम चालूं असतांना हृदाच्या क्रियेचा जोर व् पौनःपुन्य वृद्धिंगत होतात. श्वासोच्छ्रसन वेगानें व खोल राहतें. जठर, आंतडी, चर्म, मूत्र, पिंड इ० पचनाच्या व उत्सर्जनाच्या इंद्रियांच्या क्रिया वृद्धिंगत होतात. स्नायूंच्या मज्जातंतूंचा संज अधिक शक्तिमान् होतो. व्यायामाने शरीर पुष्ट होतें. मेंदू ताकदवान होतो. सर्व इंद्रियें बलवान् व क्रियावान् होतात. शाळेच्या वेळांत व्यायाम घेतल्यानें बेर्डेवांकडें बसण्याचा दुष्परि णाम व मेंदूचा शिणवटा नाहींसा होतो. विद्यार्थ्यांना मज्जेसंबंधी रोग होण्याचे प्रमाण कमी होतें. त्यानें विद्यार्थ्यांच्या वाढीतील विकृति व -न्यूनता दुरुस्त करतां येते. बसण्याची व चालण्याची ढब या संबं- भींच्या वाईट खोडी दूर करतां येतात. योग्य प्रकाराचे व्यायामाने शाळे- तील शिस्त वाढते व ( Alertness ) तत्परता, निश्चय व चपलता, गुण वाढतात. सर्व प्रकारचे व्यायाम शक्य तितक्या उघड्या हवेंत घेतले पाहिजेत. इमारतीत घेण्याचा प्रसंगच येईल तेव्हां खुल्या हवेप्रमाणे