पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २३७. शक्य तितकी स्थिति प्राप्त होईल अशी व्यवस्था ठेवावी. कपडे हलके व ढिले असावे. बूट वापरल्यास ते घट्ट नसावे. थंडी असल्यास लोक- रचे व लॅनेलचे कपडे आंतून घालावे. फार जोराने किंवा दीर्घकाल व्यायाम घेतल्यानें फार थकवा येतो व हृदयावर ताण पडतो. म्हणून तसा व्यायाम घेऊं नये. जेवल्याबरोबर घेतल्यास स्वल्प घ्यावा. विद्या- र्थ्यानें वयाच्या मानानें व्यायाम नेमावा. आजारी, व्यंग, डिफ्थोरया इ. विकारांपासून क्षीण झालेल्या व ज्यांना दूरच्या स्थानापासून शाळेत यावे लागतें अशा मुलांना विशेष सवलती दिल्या पाहिजेत, त्यांना झेपेल अशी व्यायामाची निवड केली पाहिजे. १३ ते १६ वर्षांपर्यंत वेगानें व सरळ वाढलेल्या किंवा वाढत असलेल्या मुलांवर व्यायामाची फार सक्ती नसावी. श्वास दाबून धरणें, पोक काढणे, छाती आंवळून बसणें, अशा चुक्या व व्यायाम वेड्यावाकड्या रीतीनें करणें ह्याची दुरुस्ती केली पाहिजे. व्यायामानंतर शरीर गारठू न देण्याची योग्य तरतूद केली पाहिजे. आठव्या वर्षाच्या मुलांसाठीं शारीरिक, मानसिक, व नैतिक गुणांचा विकास होण्याजोग्या संघटित खेळांपैकीं निवडक खेळ नेमावे. शिवाय काइतीपैकीं कांहींचा व्यायाम ठेवावा. १४ वें वर्षांनंतर तालमीचा व्यायाम इष्ट असतो. विशिष्ट भागाच्या स्नायुसमूहाला वळण किंवा दृढत्व येण्यासाठी तालमीची विशेष जरुरी असते. थोड्या वेळात पण फार व्यायाम करण्यापेक्षां दर वेळीं थोडा याप्रमाणें दिवसांतून अनेक वेळ व्यायाम करणें श्रेयस्कर आहे. व्यायामासाठीं मलखांब, बार, शिड्या, उभ्या व आडव्या दोऱ्या, दोयांच्या शिडया, जोडी इत्यादी अनेक साधनें ठेवावी. कधीं कधीं पांच मिनिटांची ताज्या हवेची कत्राईत पुष्कळ उपयोगी असते; ह्यामध्यें खालीं लिहिल्याप्रमाणें हुकूम दिले जातात:-