पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-२३८ आरोग्यशास्त्र 'ताठ उभे' (Stand erect ) 'मांडीस सरळ पंजे लावून ' ( Attention ) कुल्ल्यावर हात' (Hands hips ) ' तोंड बंद ' ( Shut mouth ) 'श्वास घेणें' ( Breathe in ) ( हा हुकूम सावकाश देणें ) ' श्वास सोडणें ' (Breathe out) (हा हुकूम सावकाश करणें ) हे दोन हुकूम सावकाश सहा वेळां करावे. पुढे तीन मिनिटेंपर्यंत दोहों हातांच्या गतीची सारखी व वेगानें शारीरिक कवाईत घ्यावी. हें सर्व चालू असतांना विद्यार्थ्यांनी ताठ उभे राहिलें पाहिजे व मस्तक पाठीवर झुकवूं नये. बसण्याची ढब व व्यंगः - फार लहानपणी अस्थींमध्यें कूर्चेचा अंश असतो म्हणून तीं सहज लवतात. तेराव्या वर्षी ह्यांतील कूर्चेचा भाग नष्ट होऊन त्यांत सर्व अस्थींचा भाग असतो. बसण्या- उठण्याची ठेवण नैसर्गिक नसती जर ती फार काल दुरुस्त केली गेली नाही तर कायमचे व्यंग जडतें. त्यामुळे महत्त्वाचीं इंद्रियें स्थान- भ्रष्ट होतील. ही व्यंगेंगे अस्थिकौटिल्य, गंडमाळा, क्षीण, वेगाने सरळ वाढणाऱ्या मुलांमध्यें विशेषेकरून होतात. वत होण्याचा काल ९ ते २४ वर्षापर्यंतचा असतो. " अस्थिकौटिल्यः- रिकेट्स (Rickets) ह्या विकारांत मस्तक मोठें, कपाळ उठावदार, बांधा आखूड, " (Pigeon breast) " छानी संको- चित, तंगड्या कमानदार, पोटाचें ढेरकें, पायांत पाय आडकर्णे, पायाचे तळवे सपाट व पोषण अपुरे अशी शरिराची स्थिति असते. अल्पवयस्क बालकांच्या वर्गांत अस्थिकौटिल्याचे रोगी विशेषतः सांपडतात. त्यांना दीर्घकालपर्यंत उभे करूं नये व उठण्या बसण्याची दब अनिष्ट असल्यास ती सुधारावी. अशा मुलांना नेमानें व्यायाम व ताजी हवा मिळाली पाहिजे. गंडमाळा :- ह्याचे रोगी बहुधा सुस्वरूप असतात. त्यांची