पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २३९ त्वचा गौरवर्ण व कोमल असते. त्यांच्या बांधण्याचे जागच्या व विशेषतः मानेतील गांठी विकृत होण्याचा अधिक संभव असतो; त्यांची छाती संकोचित असते. वर्गामध्ये शरिराचें अयोग्य आसन होण्याची कारणें: --- फार काळपर्यंत मेजावर काम करणे, - विशेषतः लेखन-ही वेळासंबंधीं चूक आहे. बैठकी व मेजें सप्रमाण नसणे, पुस्तकांची छपाई बरोबर नसणें, वर्गाला अपुरा उजेड असणें, वाईट संवयी, बारीक व नेत्रालगत काम करणें, व्हस्व दृष्टी, स्वास्थ्याचा अभाव व शारीरिक क्षीणता इत्यादि कारणांनी शरिराची ठेवण अयोग्य बनते. अधिक उंच, अधिक बसकीं, अधिक अरुंद, सपाट व पाठीला टेकण नसलेली आपनें; त्याचप्रमाणें अधिक उंच, अधिक बसकीं, अरुंद व चुकीच्या ढाळाचीं मेजें, आसन व मेजें ह्यांमध्ये अधिक किंवा कमी अंतर असणें, इत्यादि कारणांनीं शरिराच्या बांध्यावर अनिष्ट परिणाम घडतो. आसनांची व मेजांची व्यवस्था प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वर्षांतून दोनदां करावी. वाईट बैठकीने किंवा शरिराचे वाईट आमनानें छाती संकोचित होते, श्वासोच्छ्रसन छातीच्या गतीमध्यें व रुधिराभिसरणांत अडथळा येतो, उदरस्थ इंद्रियांचे क्रियेमध्यें बिघड होतो, स्कंध गोल व विसदृश होतात, कण्याला बाक येतो, चालण्यांत खोल लागतें, थकवा जलदी येतो, दृष्टी -हस्व होते व मस्तक दुखते. शरिराच्या चांगल्या आसनाचें वर्णन - मान व डोकें ताठ, दोन्ही स्कंध, कुल्ले, व कोपरें समांतर असावीं. बसतांना मांड्या शरिराशीं व तंगड्या मांड्याशी(Right angle) काटकोनांत असाव्या. आसन व मेज ह्रीं विद्याथ्यांजागती असल्यास ( त्यांची बैठक ) त्यांचे बसणे वरप्रमाणे