पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० आरोग्यशास्त्र असतें. शरिराच्या दोन्ही बाजूंची ठेवण सारखी असल्याने दोन्ही बाजूंचे स्नायू सारखें काम करतात व परस्परांस तोलून धरतात. म्हणून स्नायूंना कमीत कमी काम घडून आयास कमी होतो. बसण्यापेक्षां उभे राहण्याने स्नायूंना अधिक काम पडते. श्वासोच्छ्रासः - बालकाच्या श्वासोच्छ्रसनाला नाकांतील किंवा घशांतील विकृतपासून अथवा आवळ कपडे किंवा शरिराचें वाईट आसन ह्यापासून अडथळा होऊं नये. नाकांतील किंवा घशांतील विकृतीपासून श्वासोच्छ्रसनास आडकाठी होत असल्यास खालील चिन्हें होतात. तोंड उघडें असतें, शब्द पालटतो, चेहरा काळवट दिसतो, घोरणें, वरचेवर पडसें, श्वासोच्छ्रसन सुलभतेनें नसणें, कधीं कधी कर्कश किंवा भरड असणें, बुद्धिमांद्य, बधिरता, ठसका, नाकपुड्यांचा विकास कमी होणे व त्या दबलेल्या असणें अस्थि- कौटिल्य असल्यास संकुचित ( Pigeon shaped) छाती असणें ह्या भावना होतात. श्वासोच्छ्रास जोमानें करण्याचा मोठा उपयोग आहे. लहान बालकांना तर फारच आहे. त्यामुळे रुधिराभिसरणाला मदत होते व छातीचा सांठा व घेर वाढतो. ज्या मुलांना बाल्यावस्थेंत मेंडक्या ( Adenoids ) असतात किंवा ज्यांचा कणा वक्र असतो किंवा जे चोचरें बोलतात त्यांनाहि उपयोग होतो. नाकांतून वासोच्छ्वास वेण्याची संवय लाविल्याने खाली लिहिलेले फायदे होतात. मुलांचे घसे बिघडणें व तदनंतर कर्णरोग होण्याचें टळते. अंतःश्वासांत घेतलेल्या हवेतील केर, जंतू वगैरेपैकी बहुतेक भाग नासिकेच्या केसांत व श्लेष्मल त्वचेत जमून बसतात व श्वासमार्गांत किंवा जठरांत जात नाहीत. जंतूंची शक्ती कमी करण्यांचें सामर्थ्य नासिकेच्या श्लेष्मल त्वचेत आहे. .