पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २४१ खालील विकारांत नाकांतून पाणी गळू लागतें. पडसें, इन्फ्ल्यूएंझा, गोवर, ऍडेनॉइड्स, डिफ्थेरिया, लोहितांगज्वर, नाकांतील वृण अथवा परकी पदार्थ. थोडा काळपर्यंत वाईट हवेंत वासोच्छ्रसन केल्याने थकवा, मान- सिक जडत्व, गुंगी, जांभया, डोके दुखणें, झांट, बेसावधपणा, मळमळ व वांती इत्यादि भावना होतात. रोजच्या रोज वाईट हवेंत श्वासोच्छ्रसन केल्यानें तर परिणाम अधिक वाईट होतात व ते अधिक कालपर्यंत टिकतात. त्यांचें वर्णनः -- अशक्तता, जोर जोम नष्ट होणें, अग्निमांद्य व अपचन होणें, स्पर्शजन्य विकारांची अधिक भीति असणे, घसा व फुप्फुसाचे विकार आणि विरक्तता व रक्त निकस असणे, रक्त अशुद्ध होऊन वैवर्ण्य, त्वग्रोग इत्यादि विकार होतात. अस्थिकौटिल्यावें तें प्राविण्य कारण आहे. रुधिराभिसरणाचे हेतुः -- निरनिराळ्या त्वचांच्या नवीकरणा- साठीं व वृद्धीसाठीं, अन्न व प्राणवायु पोहोचवणें; स्नायूंमध्यें उत्पन्न झालेली उष्णता सर्व शरीरभर वाटणें व सर्व त्वचांमधील त्याज्य पदार्थ उत्सर्जक इंद्रियांमध्ये नेणें हे रुधिराभिसरणाचे हेतु आहेत. विद्यार्थ्यात खालील भावना झाल्या म्हणजे रक्ताच्या घटनेत किंवा हृदयाच्या क्रियेत नित्यापेक्षां कांहीं फरक झाला असें समजावें. अत्यंत फिकेपणा, विशेषतः ओष्ट, हिरड्या व पापण्यांच्या आंतील आंगांत फिकेपणा असणें ह्यास निरक्तता किंवा पांडुरता म्हणतात. ह्या रोगांत थकवा, चिडखोरपणा, चक्कर येणें, अल्पायासाने धाप लागणे, हातपाय गार खेळण्याचा कंटाळा व असणें, हृत्प्रदेश धडकी किंवा वेदना, नाक, कान, बोटांचीं टोकें निळसर असणें इत्यादी भावना असतात. १६