पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी जलाची मोठ्या प्रमाणावर शुद्धि १७ मोठ्या प्रमाणावर जलशुद्धि करण्याच्या अनेक रीती आहेत. परंतु बहुतेकांत चुन्याचें पाणी वापरणें हा सामान्य उपाय आहे. एकाद्या ठिकाणच्या कठिण जलांत चुन्याची निवळी एकजीव मिसळली तर निवळीचा व कॅरबॉनिक अॅसिड वायूचा संयोग होऊन त्यापासून खड्डू उत्पन्न होतो व तो घन व अद्राव्य असल्यामुळे त्याचा साखा तळीं बसतो. कॅरबॉनिक ऑसिड वायु नाहींसा झाल्यानें त्याचेमुळे पूर्वी द्रव स्थितीत आलेला खडूहि तळीं बसतो. ह्याला अशाश्वत काठिण्य म्हणतात. पाणी बराच वेळ उकळलें तर हाच परिणाम त्यावर घडेल. ७००० ग्यालन पाण्यांत एक डिग्री काठिण्य असल्यास त्यांत एक औंस ताजी चुनकळी घालावी. प्रथम भाजलेला चुना थोड्या पाण्यानें हौदांत विरवावा. नंतर मृदु करावयाचें पाणी त्यांत सावकाश सोडावें. लाकडी वल्ह्यांनीं तें खूप सर्वत्र व तळापासून हलवावें. खडूचा साखा जमा झाल्यानें व खाली पडत असल्याने उदकाला पांढरा वर्ण येतो. खडू- शिवाय कांहीं प्राणिज व वर्णदायक पदार्थ ह्यांचें निष्कासन या कृतीनें होतें. परंतु संयुक्त न झालेला म्हणजे एकाकी चुना पिण्याचे पाण्यांत राहूं न देण्याची खबरदारी घ्यावी; कारण त्यानेंहि प्रकृतीस अपाय होईल. असंयुक्त चुना ज्या पाण्यांत असेल त्यांत जर काडीखाराचें (आर्जंटै नैटू- सचें) पाणी घातलें तर तें पिंगट होईल. परंतु त्यांत चुन्याचा अंश मुळींच नसेल तर क्लोरैड ऑफ सिल्वरचा फक्त पांढरा साखा पात्राचे तळीं बसेल. चुन्याने फक्त अशाश्वत काठिण्य दूर होतें. म्हणून कोणी चुना व कॉस्टिक सोडा हे दोन्ही वापरतात. सोड्यानें चिरकालिक काठिण्य नाहींसें होतें. कारण पाण्यांतील कॅल्सिक व मॅग्नेसिक सल्फेट्स यांचें रूपांतर होऊन त्या दोहोंचें सोडिअम सल्फेट होतें व ह्या दोहोंच्या शेष अद्राव्य भागांचा साखा बसतो.