पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ नारोग्यशास्त्र रक्तविकार असल्यानें व रुधिराभिसरणांत न्यूनता असल्यानें, विद्या- र्थ्यांचा मेंदू व शरीर क्षीण होतें. म्हणून त्यांच्याकडून मानसिक व शारीरिक श्रम कमी ध्यावेत. खोल श्वासोच्छ्रासासारखे रुधिराभिसर - णास विशेष उपयोगी पडणारे व्यायाम करून घ्यावे. परंतु रक्ताचे गुणधर्म व प्रमाण योग्य राखावयाचे असल्यास योग्य अन्न व विपुल ताजी हवा पाहिजे. खाण्याची व रहाण्याची अव्यवस्था अस ल्यास स्कर्वी, नात्रिक रक्तपित्त व ( Purpura ) पर्च्यूरा होण्याचा संभव असतो. वात्राण्यांतील गांठी: - लिंफाचे ग्लँड - ह्यांची वृद्धि होण्याची कारणेंः—उवा, जखमा, टेंगूळ, त्वचेवर स्फोट येणें, घसा, कान, दांत इत्यादि कारणांनीं वाधाणा येतो. व मान, खाक, किंवा जंत्रा येथील गांठी सुजतात. वरील प्रकारची कारणें नसून गांठी सुजल्यास गंड- माळेचा संशय येतो. चर्मः– चर्म स्वच्छ ठेवणें ही महत्त्वाची गोष्ट आहे. मळानें चर्माचे क्रियेस व्यत्यय येतो. व ह्या अधिक कामाचा बोजा इतर इंद्रि- यांवर पडतो. मलीनतेनें गळवे, चामखीळ, वैवर्ण्य, जसे वांग, गजकर्ण इत्यादि त्वग्रोग उद्भवतात. विद्यार्थ्यांत स्वच्छतेची आवड उत्पन्न करणे महत्त्वाचें काम आहे. केस, चेहरा व हात नेहमीं स्वच्छ असली पाहिजेत. कपडे रोज धुवावे. नेहमी शीतोदकानें स्नान करावें. त्यानें चर्म व आंतील मज्जा- तंतू ह्यांवर उत्तेजक व शक्तिप्रद कार्य घडतें व सर्दी होण्याचा संभव कमी असतो. पोहण्यानें व्यायाम, आरोग्य व एक उपयुक्त कला प्राप्त होते. पोहोण्याच्या वेळी जबाबदार मनुष्य नेहमी हजर पाहिजे कोंबट पाण्याने चर्म स्वच्छ निघतें. म्हणून त्याचे क्रियेस मदत होते. आठवडयांतून एक दिवस कोंबट पाण्यानें स्नान करावें. कोंबट 1