पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २४३ पाण्याची उष्णता ९९° ते १०० व उष्णोदकाची १०५ ते ११० असते. शीतोदकाची ५५ ते ६०० असते. पोहण्याच्या पाण्याची ऊष्णता ७०° असावी. धारास्नान: - ( शॉवर बाथ ) - ह्याचा उत्तेजक परिणाम होतो. कैंस व नखें स्वच्छ ठेवणें महत्त्वाचे काम आहे: केस स्वच्छ न ठेविल्याने उवा होतात. त्या झाल्यास केस कातरावेत. डोके खाजव- ण्याने खवडे पडतात व त्यांवर खपल्या धरतात. खपल्या पडण्यासाठी पोटिसें लावितात. उवा व लिखा जाण्यासाठी रात्रीं रोज कॅर्बालिक तेल लावावें व सकाळी बारीक दात्याच्या फणीनें केंस चांगले विंचरावे. हें चालूं असतांना फणी वरचेवर विनिगरमध्यें बुचकळावी. ह्या उपायानें उवा आठ दिवसांत नाहीशा होतात. नायटे:--मुख, मान, मनगटें, हात व डोकें ह्या स्थळीं नायटे होतात. ह्यांत सूक्ष्म जंतु असतात. हा स्पर्शसंचारी विकार आहे. कपडेः--हे हलके व थोडे ढिले असावेत. त्यांपासून चलनवल- नास हरकत येऊं नये. पट्टे, बंद व बूट आवळ नसावे. आवळ अस- ल्यास रुधिराभिसरणास व स्नायूंच्या क्रियेला प्रतिबंध होतो व यकृता- सारखीं इंद्रियें स्थानभ्रष्ट होतात. अन्नः - अन्नानें शरिराची झीज भरून येते व उष्णतेची उत्पत्ति व शक्ती उत्पन्न होते. ह्याशिवाय तारुण्य अवस्थेपर्यंत व विशेषत: बाल्यावस्थेत त्यानें शरिराची वाढ होते. म्हणून वाढीच्या कालांत सत्त्व- वान अन्न मिळाले पाहिजे. मेंदूची वाढ बाळपणीं फार होते व पुढेंहि . थोडी होते. परंतु शरिराची वाढ तारुण्य संपल्यानंतर होत नाहीं, म्हणून पौष्टिक अन्नानें शरिराची कमाई ह्याच कालांत केली पाहिजे. वयाच्या मानाने मोठ्या माणसांपेक्षां मुलांना अन्न जास्त लागतें. ह्या वयांत