पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ आरोग्यशास्त्र त्यांच्या आंगीं चपलता व उत्साह ह्यांचाहि आविर्भाव होतो. म्हणून त्यांना चांगलें अन्न दिलें पाहिजे. मुलींना १० ते १४ वर्षांपर्यंत व मुलांना १४ ते २० पर्यंत तरी त्याची जास्त खबरदारी घेतली पाहिजे. वयोमानानें मुलांना रोज लागणाऱ्या अन्नाच्या घटकांचीं प्रमाणें- सात वर्ष दहवें वर्ष चवदावें वर्ष औंस औंस प्रोटीडस् २.० २.५ ३. फॅट्स २.३ ३० ३.५ कार्बोहैड्रेट्स ८.० १०.७ १२.७ मिनरल मॅटर ०७ ० '८ ० '८ अपुऱ्या किंवा अयोग्य जेवण्याचे परिणामः - कृशता, पातळ थलथलीत स्नायू, खुरट वाढ, निरक्तता व राखट चेहरा, रेच, थकवा, एकाग्रता नसणें व बुद्धिमांद्य असलें जेवण अस्थिकौटिल्य व नाविक- 'रक्तपित्ताचें प्रावण्य कारण आहे. अन्न साधें, हितकर, सुपच्य, पौष्टिक, विविध प्रकारचें असावें. ताजी भाजलेली व पाकादिकांत घातलेलीं फळें खाण्यांत यावीत. गोडाची हाव भागविण्यासाठीं माफ क गोड पदार्थ भोजनाचे शेवटीं व भुकेची शांती झाल्यावर द्यावे. अपचनाचीं कारणेंः--वाईट दांत, अपुरे चर्वण, अवेळीं भोजन, कठीण व अयोग्य अन्न, अति कढत अन्न, शिळा चहा, आवळ उदर- बंध व कमरबंध, अति आहार, जलदीचें अमित पान. वळण लावण्यासारख्या गोष्टीः -- सावकाश खाणें व चर्वण करणें. पुरेसें खावें पण अधिक वर्जावें. जेवण वक्तशीर असावें. दांत स्वच्छ ठेवावे. मलविसर्जन वेळेवर करावें.