पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २४५ वाईट दांतांचा परिणाम: -- ठणका व विश्रांति मोडणें, विद्रधी होणें व पोटांत जाणें, मानेंतील गांठी सुजणें, अपचन, दुर्गंध श्वास, मऊ अन्न खाण्याची व अपुरें चर्वण करण्याची खोड लागणे, पोषण अपुरें होणें व त्यामुळे प्रकृतीमध्ये भयंकर प्रकारच्या स्थिती उत्पन्न होणें. दुधाच्या दातांसंबंधानें विद्रधी आल्यास तिचा पक्क्या दातांवर अनिष्ट परिणाम घडतो. ह्यामुळें अपुरें चर्वण व वर्णोच्चारांत गौणपणा येतो. शेंकडा ८५ विद्यार्थ्यांना थोडा फार किडका दांत हा विकार असतो. हा विकार फार असल्यास शरिराची मापें व वजनें कमी भरतात. एका दांतांची कीड दुसऱ्या दांतास पोहोंचते. दांतांना जपणें फार महत्त्वाचें आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून विशेष काळजी घ्यावी, म्हणून दांतांची वार्षिक तपासणी ठेवावी. ऍथ्रोपोमेट्रिकल (Anthropometrical) माहितीची किंमत फार मोठी आहे. अमके वयांत वाढ फार झपाट्याने होत आहे असे समजते व त्यामुळे शरिरावर व शिक्षणावर अनिष्ट परिणाम होऊ नये. दोन्ही प्रकारचे श्रम करतां येतात. अशी वाढ यौवनावस्थेच्या सुमारास होते. उंची होऊन त्या मानानें वजन न वाढणें हें बहुधा दुश्चिन्ह असतें व तिकडे लक्ष पुरविलें पाहिजे. वाढ अपुरी असल्यास पोषण व कपडा अपुरा आहे असें समजावें, अथवा मानसिक व्यापारांत शक्तीची उधळ होत आहे, किंवा एकाद्या आजाराचें पूर्वचिन्ह आहे असें समजावें. पौष्टिक अन्नानें वाढ होते. म्हणून उंची व वजन हीं पौष्टिक अन्नाचीं निदर्शक आहेत. उच्च वर्गांतील मुलें उंच व वजनदार असतात. मंद बुद्धीचीं मुलें ठेंगणी असतात, असें डॉ. केरने दाखविलें आहे. कुटुंब, घराचा शेजार, अपुरें अन्न, हेळसांड व मुलाच्या जन्माच्या पूर्वीची