पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ आरोग्यशास्त्र व पाठीमागची वाईट स्थिती ह्यांचे परिणाम शहराचे गरीब भागांतील शाळांचे Anthropometrical माहितीवरून समजतात. सुध्यां उंची व वजन एवढ्यांचें मापन असतें. परंतु कांहीं खासगी शाळांतून छातीचीं मापें घेतात. ह्या मापनाचे खालील हेतू आहेत. ( १ ) निरनिराळ्या वयांत व दोन्ही लिंगांत मध्यपरिमाणें व फरकाची मर्यादा शोधून काढणे. ( २ ) मानसिक व शारीरिक वाढीचा परस्पर होणारा परिणाम पहाणें. ह्यामुळे निरनिराळ्या शिक्षणाच्या मार्गाने बरे वाईट परिणामाची चाचणी होते व निरनिराळ्या वयांत दिल्या जाणाऱ्या अभ्यासाचे प्रमाण ठरविणें.. ह्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझें पडत नाहीं. ( ३ ) शरिरानें किंवा बुद्धीनें नालायक मुलें वेगळी काढून स्वतंत्र शाळेत धाडणें. ( ४ ) मापांचे मध्य परिमाणापेक्षां फरक पुष्कळ विद्यार्थ्यांत दिसल्यास त्या शाळेंतील सर्व मुलांच्या सामाजिक स्थितीबद्दल व राहत्या मोहल्याबद्दल चौकशी करण्यास साधन मिळतें. भिन्न ठिकाणच्या मापनावरून खालील गोष्टी पाहण्यांत येतात. ( १ ) बाराव्या वर्षांपर्यंत मुलींच्यापेक्षां मुलगे वजनदार असतात. १२ ते १५ वयांत मुलींचीं वजने व उंची अधिक भरतात. १५चे पुढे मुलींची वाढ फार बेताने होते. १२ ते १५ पर्यंत मुलींची वाढ झपाट्यानें होते. १६ वर्षापासून पुढे मुलगे अधिक उंच व वजनदार असतात. त्यांची वाढ २० वर्षांपर्यंत होत असते. १४ ते १६ पर्यंत त्यांची वाढ झपाट्यानें होते.