पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २४७ मुलांमध्ये वार्षिक उंचीत वाढीची कमाल ५/६ वर्षांत (३ इंच) व १४ । १५ वर्षात ( ३ इंच) होते. मुलींची वाढीची कमाल १२ व १३ वर्षी असते. आंधळे, मुके व बहिरे, अपस्मारयुक्त मुलें, व ज्यांची बुद्धी अत्यंत मंद आहे अशाकरितां तर निराळ्या शाळा अवश्य पाहिजेत. परंतु मध्यम बहिरे, मंद बुद्धीचें, शरिराने व्यंग, नाजूक व क्षयी, डोळे आलेले व नायटे झालेले अशा लोकांकरितां शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करावी. उघड्या मैदानात लांकडांचीं साधी घरे बांधून त्यांत नीरक्तता, फुप्फुसांसंबंधी क्षयाची मुग्धावस्था, गंडमाळा, बुद्धिमांद्य व हृदाचा रोग इत्यादि विकार झालेल्या विद्याथ्यांच्या कारेतां स्वतंत्र शाळा स्थापन कराव्या. शाळेबाहेर लगतच वर्गाकरितां जमिनीवर बस्करें किंवा खुर्च्या हंतराव्या. वर्ग संपल्यावर त्यांवर निजण्याची परवानगी असावी. ह्या शाळेत शिक्षण तीन तासांपेक्षां ज्यास्त नसावें. अशा शाळेत विद्यार्थ्यांचे प्रकृतीत सुधारणा होईल व शिक्षणाचा अधिक फायदा होईल. धन्याचे जुलमापासून मुलांचे संरक्षण करणें, हा जसा हक्क सर- कारला असतो, त्याप्रमाणें त्यांचे आईबापांपासून रक्षण करण्याचाहि हक्क आहे. शाळेशिवाय मुलांना नोकरीचें किंवा घरांतील काम ज्यास्त पडू देता कामा नये. १२ वर्षांपर्यंत कोणालाहि नोकरीत ठेवू नये. १४ ते १६ वर्षांपर्यंत त्यांचेकडून निम्मा दिवस काम ध्यावें. व शिवाय वेळेच्या व इतर सवलती त्यांना मिळाव्या. १६ व्या वर्षी शरिराचे सामर्थ्याचा दाखला आणणाराला कारखान्यांत ठेवावें. शाळेतील स्पर्शसंचाराचा फैलाव , देवी घटसर्प (डिप्थेरिया), गोवर, डांगा खोकला, गालगुंड, लोहितांग- ज्वर, विषूचिका इत्यादि स्पर्शसंचारी रोगांचा फैलाव होऊं नये म्हणून