पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ आरोग्यशास्त्र आरोग्याचे सरकारी अधिकारी, शिक्षक व शाळेचे डॉक्टर ह्यांनी सहकारि- तेनें वागलें पाहिजे. वरील पैकी कोणत्याहि आजारानें मूल पडल्यास त्याची खबर पालकांनी, त्यांचे डॉक्टरांनी, व शिक्षकानें सरकारी आरोग्याचे डॉक्टराकडे दिली पाहिजे. अर्थात् अशा आजारी मुलाला शाळेत येण्याचा प्रतिबंध केला पाहिजे. तें मूल बरें होऊन घराचें निर्जंतुकरण होईपर्यंत त्या घरांतील मुलामाणसांना शाळेत येण्याची मनाई केली पाहिजे. असा आजारी शाळेच्या एकादे वर्गात आला असेल तर त्या वर्गाची खोली कांहीं दिवस बंद ठेवून तिचें निर्जंतु- करण झाल्यावर त्यांत वर्ग भरवावा. अनेक वर्गांची जागा दूषित झाल्यास वेळेनुसार सबंध शाळा देखील बंद ठेवावी लागेल. एकाद्या प्राथमिक किंवा अन्य शाळेत आरोग्यदायक व्यवस्था नस- स्यानें मुलांमध्यें टैफॉईड ज्वर अथवा डिप्थेरिया होतो असें दिसून आल्यास तसली शाळा बंद ठेवावी. गोवराची सांथ चालूं असतांना पडसे आलेल्या प्रत्येक मुलास शाळेत येण्याची तीन दिवस बंदी ठेवावी व दुसऱ्या सांथी सुरू असतांना संशयित मुलांना तोच नियम लागू करावा. सौम्य प्रकारच्या रोग्यांची परीक्षा न झाल्यानें सांथीचा प्रसार शाळेत होतो. त्याप्रमाणे बाह्यतः दुरुस्त झालेले, परंतु ज्यांचे अंगांत रोगजंतु कित्येक महिने किंवा वर्षे असतात, अशा रोगजंतुवाहक लोकांमुळें सांथीच्या रोगांचा प्रसार शाळेत होतो. म्हणून सांथीमध्ये सर्व संशयित रोगी घालवून द्यावे. व जंतुवाहकांचा तपास करावा. ज्वराच्या सामान्यता भावनाः - अस्वस्थता, चिडखोरपणा, झांपड, मळमळ, वांती, शहारे येणे, डोके दुखणें, क्षुधानाश, जिभेवर भुरशी येणें, तद/न, नाडी व श्वासोच्छ्वास जलद चालणें, तप्त व शुष्क चर्म, अथवा स्वेद शंभर चेंवर उष्णमान.