पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २४९ स्पर्शसंचारी विकाराचीं प्रमुख व विशेष चिन्हें डिप्थेरिया :- अत्यंत अशक्तता, घसा येणें, मेणक्यावर मळकट व पांढरे पापुद्रे, येर्णे, भरड श्वासोच्छ्रास, घोगरा आवाज, खालच्या दाभाडाच्या मागील टोंकाजवळील ग्रंथीची सूज व नाकांतून साव. गोवर (मिजल्स ) :- मस्तकांत फार सरदी झाल्यासारख्या भावना होतात. डोळे लाल होणें, त्यांना पाणी येणें, नाकांतून पाणी वाहणें, इत्यादि चिन्हें प्रथम होतात. तीन दिवसांनंतर पिसवा चावल्यासारख्या बारीक लाल पुटकळ्या चेहऱ्यावर व हातावर उठतात व त्या लवकर सर्व अंगावर पसरतात. बहुधा ज्वर १०० ते १०२° असा मध्यम असतो. बहुधा कोरडा खोकला येतो. कधीं कधीं घसा धरतो. जर्मन मिजल्स: - यांतील पुरळ कांहींसा गोवरासारखा असतो. परंतु आरंभीं मस्तकांतील थंडीच्या भावनांच्या ऐवजी घसा धरतो. लाल- लोहितांगम्बरः -- ( स्कार्लेट फीवर ) वसा धरणे, वांती, भडक जीभ. स्फोट लालभडक असतात व ते प्रथम मानेवर व छातीचे वरल्या भागीं उठतात व नंतर सर्व शरीरभर पसरतात. पुढें त्वचेची कात जाते. कधीं कधीं कान फुटतो. डांग्या खोकला ( व्हूपिंग कॉफ ) :- हा एकदोन आठवडे साध्या खोकल्याप्रमाणें वाटतो. पुढें -हस्त्र जोराचे उच्छ्रासयुक्त उसके येतात व शेवटीं चमत्कारिक विशिष्ट प्रकारचा अंतःश्वास अथवा ध्वनी उत्पन्न होतो. ह्या प्रकारच्या अनेक उबळी लागोपाठ येतात. शेवटीं मूल ओकतें व घशांतून चिकट दोरासारखा कफ बाहेर पडतो. वरील चमत्कारिक अंतःश्वास हें निश्चयात्मक चिन्ह आहे. गालगुंडे ( Mumps ) : - खालच्या दाभाडाच्या मागील कोना- पलीकडे व कर्णाचे खालीं वेदनायुक्त सूज येते. ती फार पसरते. कधीं