पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० आरोग्यशास्त्र एकाच बाजूला येते. तोंड उघडतां येत नाहीं. १००० ते १०२२ पर्यंत ज्वर असतो. अंतज्वर (एंटेरिक फीवर किंवा टैफाईड ज्वर ) कपाळ जोरानें ठणकर्णे, हातपाय दुखणे, मळमळ, उलटी, थकत्रा, १०३° ते १०४° पर्यंत वाढत जाणारा ज्वर, बहुधा अतिसार असतो. मेंदूच्या भावना असतात. सुरुवातीनंतर दहा दिवसांनी लहान व तांबडे स्फोट बहुधा उदरावर येतात. मसुरिका ऊर्फ देवी (स्मॉल - पॉक्स) : - मळमळ, पाठीत ठणका, वांती, थंडी वाजून जोराचा ज्वर, एकदोन दिवसांत रोगाचा भर. नंतर स्फोट उमटतात. ते प्रथम चेहऱ्यावर येतात, पुढें तीन दिवसांनीं जलोत्पत्ती होते. नंतर पू होऊन खपल्या पडतात. वाऱ्याफोड्याः -- (चिकन पॉक्स) ज्वर सौम्य, फोड विरळ; ते प्रथम अंगावर व तोंडावर येतात, त्यांन लवकर पाणी सांठते व पांचचार दिवसांत खपल्या पडतात. मुलाला देवी काढल्या असल्यास देवी बहुधा सौम्य येतात व रोग वाया फोड्याप्रमाणे दिसतो. प्रकरण ११ वें जंतुविचाराचीं मूलतत्त्वें सूक्ष्म जंतूंचा व विशेषेकरून त्यांपैकी बॅक्टेरिया नामक उद्भिज जंतूंचा ज्या शास्त्रांत विचार केलेला असतो त्यास जंतुशास्त्र म्हणतात. आकस्मिक कारणें न उद्भवल्यास हे सूक्ष्म जंतू अमर असतात. एक