पान:आरोग्यशास्त्र.pdf/२५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वें २५१ जंतु विभागून त्याचे दोन सजीव व परिपूर्ण भाग अथवा जंतु होतात. ह्या प्रत्येकाचे असेच विभाग होऊन त्याची वाढ इतकी जलद होते की पंधरा तासांत या जंतूंच्या वीस ते पंचवीस पिढ्या होतात. सूक्ष्म जंतूंपासून फायदे फार आहेत. तरी पण नाना प्रकारचे रोग त्यांचेपासून उत्पन्न होतात. जंतु वनस्पतीचे जीवनास अत्यावश्य आहेत. आणि धान्ये, फळे इत्यादि उद्भिज पदार्थ मनुष्यादि प्राण्याचे जीवित्वाला अत्यंत जरूरीचे असल्यामुळे उपकारक जंतूंवांचून प्राणि- मात्रांचें मुळींच चालणार नाहीं. स्वतामध्ये असणारे प्रोटीन्स, युरीआ व अन्य नैट्रोजनयुक्त प्राणिज व उद्भिज पदार्थांची घटना बिकट असल्या- मुळे ते वनस्पतींना जसेच्या तसेच शोषून घेतां येत नाहीं पण वरील प्रकारच्या पदार्थांत सूक्ष्म जंतु कुजण्याची क्रिया उत्पन्न करतात व त्याचेपासून आमोनिया, नेट्रेट्स असे स्वल्प घटनेचे पदार्थ निर्माण करतात. व ह्या रूपांत त्यांचे शोषण वनस्पती करतात. एका शोधकानें जंतुविरहित केलेल्या जमिनीत वीं पेरले आणि त्यांत जंतु नसलेले दूध व साखर आणि पिष्ट सत्त्वाचें ( स्टार्च ) द्रावण घातलें. तपासाअंतीं असे आढळून आले की, दूध कौरे पदार्थात फेरफार झाले नाहीत. बेण्याचें वजन कमी झालें. त्यापासून बारीक रोपें उत्पन्न झाली. पुढें तीं कोमेजली व शेवटी मरून गेली. ह्यावरून वनस्पतीच्या जीवनास जंतु आवश्य लागतात हैं सिद्ध होते. आंतड्यांत नेहमी असणाऱ्या बॅक्टेरि- याचा शरिराचे स्वाभाविक पोषणास उपयोग होतो. व्यापारी दृष्टया बॅक्टेरियापासून पुष्कळ फायदा आहे. त्यांचे अभावी दरवाळण्याची क्रियाहि ( फर्मेन्टेशन ) घडणार नाहीं. व औषधे तयार करण्यामध्ये व निरनिराळ्या धंद्यांमध्ये उपयोगी पडणारी रेक्टिफाईड स्पिरिट तयार करतां येणार नाहीं. त्याचप्रमाणे निरनिराळें ईथर व नील बनवितां यावयाचीं नाहींत. येणेंप्रमाणे जंतूंपासून उपयोग होतो.