पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ आरोग्यशास्त्र वाळू व कंकर घालून केलेल्या फार मोठ्या प्रमाणाचें फिल्टरचें वर्णन मागें दिलें आहे. म 1) स्पंजी आयर्न--हिमेटैट नामक अशोधित लोहावर अग्निसंस्कार केल्यानें एक बहुच्छिद्रयुक्त चाळणीसारखे व जाड पत्रे तयार होतात. ह्या पदार्थापासून प्राणिज पदार्थांचें देखील दूरीकरण होतें. ह्यापासून नवीन पदार्थांची उत्पत्ति होत नाहीं. लोहाचे कांहीं कण पडतात. परंतु वालु- काचे शोधांतून पाणी शुद्ध केल्यानें ते अलग होतात. स्पंजी आयर्नमध्यें हैं शोधकत्व फार दिवस टिकतें. परंतु कांहीं कालानें तें पालटून त्याचे जागीं नवें घालावें लागतें. स्पंजी आयर्नमुळे पाण्यांतील शिशाचें दूरी- करण होतें. ह्या लोहाचे द्रव्यापासून पाण्यांत जंतुपोषण करणारे असे ने फॉस्फेट्स ते पैदा होत नाहींत, हा एक त्याचे अंगीं चांगला धर्म आहे. म्हणून जंतूंची उत्पत्ति न होतां याचे साहाय्यानें केलेलें शुद्ध जल कांहीं दिवस सांठवितां येतें. ह्या अशोधित धातूमुळे प्राणिज पदार्थांचा ( ऑक्सिडेशन ) प्राणवायूशी संयोग होऊन ते निर्वीर्य होतात. व त्यांमध्ये असणारे जंतु नाश पावतात. ह्या धातूला हवा लागल्यास तिची सच्छिद्रता नाहींशी होते. म्हणून ती नेहमीं उपयोगांत आणून जलांत ठेवावी. HIPS Bi पोलरेट किंवा मॅग्नेसिक कार्बाइड ऑफ आयर्न ही एक लोहमय अशोधित धातु आहे. हिचे धर्म स्पंजी आयर्नप्रमाणे असून हिच्यांत हें एक विशेष आहे कीं, ह्या धातूचें शोधकत्व अबाधित व चिरकाल राहार्ते. परंतु ह्या अशोधित धातूचा उपयोग स्पंजी आयर्नप्रमाणें रोज न करतां मधून मधून करावा, म्हणजे ऑक्सिडेशनची शक्ति कायम राहते. हें द्रव्य हवेनें बिघडत नाहीं. मोठ्या प्रमाणावर जलाचे निर्जंतुकरण कि हें निर्जंतुकरण हल्लीं तीन तन्हेने करण्यांत येते. : - ( १ ) क्लोरिन