पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ आरोग्यशास्त्र बॅक्टेरिया ऊर्फ स्किजो मैसोर्टस विभागजन्य सूक्ष्म जंतु हे सूक्ष्म व उद्भिज सजीव कण आहेत. ते बहुतकरून एका सूक्ष्म पेशीचे (सेल) बनलेले असतात. त्यांना हिरवा रंग नसतो. त्यांचे आडवे तुकडे पडून त्यांची संख्या वाढते. त्यांमध्यें धाग्यांचे आकाराच्या कांहीं जंतूंचा समावेश होतो. बॅक्टेरिया हे साधे सूक्ष्म कण -नाहींत. त्यांचे रचनेंत व क्रियेत पुष्कळ बिकटपणा असतो. ते सूक्ष्म- दर्शकानें मात्र दृष्टिगोचर होतात. एक चौरस इंच जागेत ते सुमारें ४० कोटी मावतील. त्यांचें आकारमानहि भिन्न असतें. व स्वरूपहि निरनिराळे असते. कांहीं गोल, कांहीं लांबोडे, कांहीं धाग्यासारखे अथवा अंडाकृति असतात. कांहीं कांहीं नागमोडीच्या आकाराचे असतात. गोल जंतूंना कोकी म्हणतात. दंडाकृती जंतूंना बॅसिली म्हणतात. व नागमोडी आकाराच्या जंतूंना स्पॅरिली म्हणतात. वरील सूक्ष्म पेशींचें टोंक बहुधा गोल व चौकोनी असत. या पेशीचे बाह्य भागीं एक त्वचा असून तिचे आंत प्रोटो प्लॅजम असतो. पेशींची बाह्य त्वचा कधीं कधीं जाड होते, फुगते व एकसारखी होते. जेव्हां बॅक्टेरिया विसाव्याची अवस्था पावतात तेव्हां त्यांचे पुंज दाट पाकासारख्या द्रव्यांत एक- मेकांस चिकटून बसतात. निरनिराळ्या जातींच्या बॅक्टेरियांची रासायनिक घटना भिन्न असते. बॅक्टेरियांना द्रव पदार्थात सोडल्यास एका अचल स्थानाभोंवतीं हेलकावयाची गति त्यांचे अंगी होत असते असे दृष्टीस पडते. यांस ब्रोनची गती म्हणतात परंतु जंतूंमध्ये स्थलांतर करण्याचीं गति नसते. कांहीं जातींचे बॅक्टेरियांत ब्रोनची देखील गति कधींहि नसते. कांहींमध्ये त्यांचे नवेपणीं वाढीचे आणि पूर्णत्वाचे स्थितींत गति असते. कांहीं कालांत त्यांचे मध्ये स्थिरता येते. d